Ram Mandir Pran Pratishta: अखेर रामलल्ला पोहोचले आपल्या नव्या घरी; मंदिराच्या गर्भगृहात आगमन

Ram Mandir Pran Pratishta: अयोध्येत रामलल्लाला त्यांच्या मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू आहे. आज 18 जानेवारी 2024 हा राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे.
Ram Mandir Pran Pratishta
Ram Mandir Pran PratishtaEsakal
Updated on

अयोध्येत रामलल्लाला त्यांच्या मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू आहे. आज 18 जानेवारी 2024 हा राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याआधी आज (गुरुवारी) रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या 'गर्भ गृह'मध्ये ठेवण्यात आली आहे.

काल 'कलश पूजन' करण्यात आले. त्यानंतर आज गर्भगृहात एक अनोखा पूजन सोहळा झाला आणि आज (गुरुवारी), 'जय श्री राम' च्या जयघोषात मूर्ती क्रेनचा वापर करून काळजीपूर्वक आत हलवण्यात आली.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महत्त्वपूर्ण सात दिवसीय विधी 21 जानेवारीपर्यंत सुरू राहतील. 'प्राण प्रतिष्ठे'च्या दिवशी सोहळा दुपारी 12:20 वाजता सुरू होणार आहे. 22 जानेवारी रोजी, आवश्यक विधी केल्या जातील.

Ram Mandir Pran Pratishta
Ram Mandir Postage Stamp : पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केली श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे; पाहा व्हिडिओ

दुपारी १ वाजता समारंभाची सांगता होईल. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यांनी मंदिराच्या बांधकामाच्या अपूर्ण अवस्थेचा हवाला देत सोहळ्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि भाजपचा राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे दावे फेटाळून लावत, श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर खरोखरच पूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी स्पष्ट केले की तळमजला, गर्भगृह आणि प्रभू रामाला समर्पित असलेले पाच मंडप पूर्णतः बांधलेले आहेत.

Ram Mandir Pran Pratishta
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील मंदिरासाठी केली होती 'भीष्म' प्रतिज्ञा, रामभक्त 31 वर्षानंतर सोडणार उपवास

सुरू असलेले बांधकाम पहिल्या मजल्याशी संबंधित आहे, ज्याला राम दरबार म्हणून ओळखले जाईल आणि दुसरा मजला, विविध विधी आणि समारंभांसाठी आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सोमनाथ मंदिराच्या बांधकामाशी समांतर चित्र काढत या भूमिकेचा बचाव केला. गर्भगृह पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आणि अशा प्रक्रियेच्या ऐतिहासिक उदाहरणांवर त्यांनी भर दिला.

Ram Mandir Pran Pratishta
Ram Mandir Ayodhya: अभिषेक करण्यापूर्वी रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गाभार्‍यात आणली, VIDEO पाहा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.