Ram Mandir Ayodhya : संगमरवर अन् सोन्याच्या आठ फूटांच्या सिंहासनावर बसणार प्रभू श्रीराम, 'या' दिवशी पोहोचणार अयोध्येत

अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaRam Mandir Ayodhya

अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यादरम्यान श्रीराम मूर्ती ही संगमरवर आणि सोन्यापासून बनवण्यात प्लेट असणाऱ्या आठ फूट उंच सिंहासनावर बसवण्यात येणार आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, सिंहासन राजस्थानातील कारागीरांकडून तयार केले जात आहे. जेकी १५ डिसेंबर पर्यंत अयोध्येत पोहचेल. हे सिंहासन आठ फूट उंच आणि चार फूट रुंद असणार आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले की, पहिल्या मजल्यावर १७ खांब लावण्यात आले आहेत फक्त दोन खांब लावणे शिल्लक आहे. पहिल्या मजल्याचे छत १५ डिसेंबर पर्यंत तयार होईल अशी अपेक्षा आहे. परिक्रमा मार्गाच्या फ्लोरिंगचे काम पूर्ण झाले आहे आणि गृह मंडपातचे प्लोरिंगसाठी संगमरवर अंथरण्याचे काम सुरू आहे.

Ram Mandir Ayodhya
Maratha Reservation: नवले पुलावरील जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल

तसेच त्यांनी सांगितलं की श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने सांगितले की, प्रवासी सुविधा केंद्राच्या तीनही मजल्यांचे छप्पर बांधण्यात आले आहे, तर राम मंदिराच्या बाहेरच्या भिंतीच्या प्रवेशद्वाराचे काम शेवटच्या टप्प्यात आहे आणि नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ते पूर्ण होईल.

राम मंदिरासाठी अनेकांनी सोने आणि चांदीच्या वस्तू दान केल्या आहेत. मिश्रा म्हणाले की, भक्तांनी दिलेले सोने आणि चांदी वितळवले जाईल. कारण हे एका जागी ठेवणे कठीण आहे. त्यांनी सांगितलं खी हे दागीने वितळवण्याचे काम एका प्रतिष्ठित संस्थेच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल.

Ram Mandir Ayodhya
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय घडतंय, वाचा इससाइड स्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com