Ram Mandir Inaguration: चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत, दिलं 'हे' कारण...

अयोध्येत २२ जानेवारीला रामल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातील नेते, अभिनेते अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवले आहे. निमंत्रणावरुन राजकारण देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मोठी माहिती समोर आली आहे.
Swami Avimukteshwaranand Saraswati
Swami Avimukteshwaranand Saraswati
Updated on

Ram Mandir Inaguration: अयोध्येत २२ जानेवारीला रामल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातील नेते, अभिनेते अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण पाठवले आहे. निमंत्रणावरुन राजकारण देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मोठी माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी सांगितले की चारही शंकराचार्य २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inaguration) सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. कारण हे सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन आहे. अविमुक्तेश्वरानंद हे त्यांचे गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये शंकराचार्य बनले.

तसेच पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे ‘शास्त्राविरुद्ध’ कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते.  

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती काय म्हणाले?

चार शंकराचार्य २२ जानेवारीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याप्रती द्वेष नाही. मात्र हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांनाही तसे करण्यास सुचवणे, ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात गुंतलेले लोक हिंदू धर्मातील नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा अभिषेक सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पहिले उल्लंघन आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले.

Swami Avimukteshwaranand Saraswati
Uddhav Thackeray 5 Mistakes: उद्धव ठाकरेंच्या 5 चुका...नाहीतर 'शिवसेना' असती फक्त ठाकरेंची! नेमकं कुठं चुकलं?

२२ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री बाबरी मशिदीमध्ये रामाची मुर्ती ठेवण्यात आली तेव्हा आणि आणि १९९२ मध्ये ढाच्या पाडला तेव्हा वेगळी परिस्थिती होती. ह्या घटना उत्स्फूर्तपणे घडल्या. त्यामुळे कोणत्याही शंकराचार्यांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केले नाहीत. मात्र आज तशी परिस्थिती नाही. आमच्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचे  स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, आम्ही यापुढे गप्प बसू शकत नाही. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करणे आणि देवाची मूर्ती बसवणे ही वाईट कल्पना आहे. ते (कार्यक्रमाचे आयोजक) आम्हाला मोदीविरोधी म्हणतील अशी शक्यता आहे. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही, पण आम्ही आमच्या धर्मग्रंथांच्या विरोधात जाऊ शकत नाही.

Swami Avimukteshwaranand Saraswati
Uddhav Thackeray 5 Mistakes: उद्धव ठाकरेंच्या 5 चुका...नाहीतर 'शिवसेना' असती फक्त ठाकरेंची! नेमकं कुठं चुकलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.