Ram Mandir Inauguration: आध्यात्मिक वनात दिसणार वनवासातील राम; शरयू तिरावर उभे राहणार ओपन एअर म्युझियम

अयोध्येतील शरयू नदीच्या तिरावर ‘रामायण आध्यात्मिक वन’ साकार होत असून त्यातून भाविकांना प्रभू श्रीरामाचा १४ वर्षांच्या वनवासाचा काळ अनुभवता येईल.
Ram Mandir Inauguration
Ram Mandir Inauguration
Updated on

Ram Mandir Inauguration: 

नवी दिल्ली: अयोध्येतील शरयू नदीच्या तिरावर ‘रामायण आध्यात्मिक वन’ साकार होत असून त्यातून भाविकांना प्रभू श्रीरामाचा १४ वर्षांच्या वनवासाचा काळ अनुभवता येईल. या वनसंपदेत ‘ओपन- एअर म्युझियम’चा देखील समावेश असून त्यात रामायणातील काही प्रसंग पाहता येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. अयोध्येत तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचाच तो एक भाग आहे.

अयोध्या फेरी विकास प्रकल्पाचा आराखडा आखणारे दिक्षू कुकरेजा म्हणाले,‘‘ हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीराम आणि शरयू नदीला महत्त्वाचे स्थान असून प्रस्तावित आध्यात्मिक वन आराखडा हा रिव्हरफ्रंट प्रकल्पाचा एक भाग आहे. रामायणाचे कथा सूत्र डोळ्यासमोर ठेवूनच हा इकोफ्रेंडली प्रकल्प उभारण्यात येईल. वनवासाच्या काळामध्ये प्रभू श्रीराम यांनी कशापद्धतीने प्रवास केला? याची खास दृश्ये येथे पाहायला मिळतील.’’

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ भाविकच नाही तर निसर्गप्रेमींसाठी देखील येथे खूप काही उपलब्ध असेल. पर्यावरण आणि अध्यात्माचा अनोखा संगम येथे पाहायला मिळणार आहे.’’ अयोध्येचा फेरविकास आराखडा हा येत्या दहा वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून या शहरामध्ये तब्बल ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. सार्वजनिक आणि खासगी भागिदारीतून रामायण आध्यात्मिक वनाची उभारणी करण्यात येत असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.

Ram Mandir Inauguration
Atal Setu Inauguration: लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार; CM एकनाथ शिंदेंचा इशारा

रामासाठी अडीच किलोचा धनुष्य-

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेला अडीच किलो वजनाचा धनुष्य ठेवण्यात येईल. या धनुष्याची निर्मिती चेन्नईमध्ये करण्यात आली असून लवकरच तो श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सोपविण्यात येईल.

वाल्मीकी रामायणामध्ये ज्या पद्धतीने धनुष्याचे वर्णन करण्यात आले आहे अगदी तसाच हा धनुष्य साकारण्यात आला आहे. चेन्नईतील कलाकारांनी या धनुष्याची निर्मिती केली असून मागील दोनशे वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. या धनुष्यासाठी २३ कॅरेटचे सहाशे ते सातशे ग्रॅम सोने वापरण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Ram Mandir Inauguration
Atal Setu: मुंबईतील 'अटल सेतू'च्या उद्घाटनावेळी PM मोदींनी काढली शिंजो अबेंची आठवण; म्हणाले, आम्ही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.