अयोध्येत उद्यापासून भक्तीचा आनंदोत्सव; राज्यातील २६ पुरोहितांना निमंत्रण; 'असे' आहेत धार्मिक कार्यक्रम

अयोध्येच्या रामलल्ला मंदिरातील प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधींना मंगळवारपासून (ता. १६) सुरुवात होणार आहे.
Ram Mandir Pran Pratishtha Ramlalla idol temple consecrated rituals starts from Tuesday  marathi news
Ram Mandir Pran Pratishtha Ramlalla idol temple consecrated rituals starts from Tuesday marathi news
Updated on

पुणे : अयोध्येच्या रामलल्ला मंदिरातील प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधींना मंगळवारपासून (ता. १६) सुरुवात होणार आहे. सात दिवस हे विधी चालणार असून, पुढील सोमवारी म्हणजेच २२ जानेवारीला प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होईल. देशभरातील १२१ पुरोहितांचा ब्रह्मवृंद या विधीचे पौरोहित्य करणार असून, त्यामध्ये राज्यातील २६ पुरोहितांचा समावेश आहे. (Ram Mandir Pran Pratishtha)

प्रारंभी श्री क्षेत्र काशी येथे कांचीपीठ शंकराचार्यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी आणि आदरणीय श्री चंपतरायजी यांच्याद्वारा काशी येथील श्री लक्ष्मीकांतशास्त्रीजी दीक्षित यांचे प्राणप्रतिष्ठा विधीचे प्रधान आचार्य म्हणून वरण झाले. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणाऱ्या पंडित श्री गणेश्वरशास्त्रीजी द्राविड यांच्या मार्गदर्शनात हे विधी होणार आहेत. या विधीत सर्व वेदांच्या शाखांचे विद्वान पारायणात सहभागी होतील. या प्राणप्रतिष्ठा कार्यात सहभागी होण्याचे निमंत्रण राज्यातील २६ ब्रह्मवृंदांना मिळाले आहे.पान ८ वर

अयोध्येत उद्यापासून भक्तीचा आनंदोत्सव

प्राणप्रतिष्ठेच्या विधींबाबत माहिती देताना वेदमूर्ती गजानन अवचट म्हणाले, ‘‘गेल्या अश्विन महिन्यांपासून अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिरात अनेक विधी सुरू आहेत. श्रीरामलल्लाचे अघोरहोम, अयोध्येचे ग्रामदैवत तसेच स्थानदैवतांचे पूजन-अर्चन, वेद पारायणादि अनुष्ठान चालू आहेत. चल आणि अचल, असे प्राणप्रतिष्ठेचे दोन प्रकार आहेत. भगवान श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे भगवंताचे अर्चावतार होणार आहे. मंगळवारपासून या विधीला सुरुवात होईल.’’

भगवान श्रीराम हे वनवासात असताना त्यांचा वास्तव्याचा सर्वाधिक काळ महाराष्ट्रातील नाशिकमधील पंचवटीत व्यतीत होते. त्यामुळे श्रीरामचंद्रांच्याच असीम कृपेने आपल्या महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांना श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळते आहे, ही भाग्याची गोष्ट आहे.

- वेदोपासक गजानन अवचट, पुणे

धुळ्यातील श्रीराम वेद विद्यालयाचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत केले काका यांच्या माध्यमातून विशाल केले यांच्याकडून श्रीरामलल्लांच्या अचल प्राणप्रतिष्ठेसाठी लागणारे २०० तांब्याचे कलश धुळ्यात घडविण्यात आले. तसेच, श्रीराम मंदिरासाठी आणि यज्ञासाठी लागणारे विशिष्ट दिशानिर्देशित ध्वज देखील धुळ्यातूनच तयार केले आहेत. धुळेवासियांतर्फे ही सेवा श्रीराम रामचंद्रांच्या चरणी अर्पण करण्यात आली. मला स्वतःला प्राणप्रतिष्ठा विधीत सहभागी होता येत आहे, हा परमोच्च भाग्याचा क्षण आहे. आजीवन ही गोष्ट माझ्या स्मरणात राहील.

- वेदमूर्ती केशव अयाचित, धुळे

Ram Mandir Pran Pratishtha Ramlalla idol temple consecrated rituals starts from Tuesday  marathi news
Hingoli Triple Murder : तो अपघात नव्हताच! मुलानेच केली आई-वडील अन् भावाची हत्या; कारण...

यांचा असेल समावेश

सर्वश्री वेदमूर्ती शांताराम भानोसे, दिनेश गायधनी, वसंतराव जोशी, वसंत फडके, सागर देव, गोपाळ जोशी, देशिक कस्तुरे, कृष्णा पळसकर, प्रशांत जोशी, शशांक कुलकर्णी, निखिल भालेराव, विजय भालेराव, केशव आयाचित, गजानन अवचट, अनंत मुळे, संदीप कापसे, महेश नंदे, सुजित देशमुख, भूषण जोशी, अमोल पाध्ये, नारायण सुलाखे, प्रसाद लाडसांगवीकर, गोरक्षनाथ पैठणकर, दुर्गादास अंबुलगेकर, चंद्रशेखर भोगे, गोपाळ उपाध्ये यांचा अयोध्येतील निमंत्रितांमध्ये समावेश आहे.

Ram Mandir Pran Pratishtha Ramlalla idol temple consecrated rituals starts from Tuesday  marathi news
मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी

असे आहेत धार्मिक कार्यक्रम

१६ जानेवारी : प्राणप्रतिष्ठा अधिकारार्थ शरयू तीरावर मुख्य यजमानांचे (प्रायश्चित्त विधी) दशविध स्नान, गोदान होईल.

१७ जानेवारी : जलयात्रा, कलश पूजन, ब्राह्मण-बटू-कुमारी-सुवासिनी पूजन, कलशयात्रा आणि मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा होईल.

१८ जानेवारी : प्रधान संकल्प केला जाईल, सर्व देवतांचे पूजन, चारही वेदांच्या मंत्रांचे पुण्याहवाचनादि पंचांग, मंत्रपाठ, यज्ञमंडपात प्रवेश, भूमिपूजन, यज्ञमंडपाचे पूजन. भगवान रामलल्लांचा जलाधिवास, धान्याधिवास, गंधाधिवास असे ३२ अधिवासापैकी समयोचित अधिवास केले जातील. म्हणजे काही काळासाठी पाणी, धान्य, गंध आदी गोष्टींमध्ये भगवान श्रीरामलल्लांची मूर्ती ठेवली जाईल.

१९ जानेवारी : सर्व देवतांचे प्रातः पूजन, वेद पारायणांची व्यवस्था, देवप्रबोधन म्हणजे अधिवासातून देवाला जागृत करणे, हवनाची सुरुवात, मंदिराची वास्तुशांती. त्यानंतर मूर्तीला झोपवून, सायंकाल पूजन करून आरती होईल.

२० जानेवारी : नित्यप्रातःपूजन, शर्कराधिवास, फलाधिवास, ८१ कलशांद्वारे प्रासादस्नान, पिंडीकाधिवास, पुष्पाधिवास होईल.

२१ जानेवारी : नित्यपूजन, मधाधिवास, विविध औषधींद्वारा १०८ कलशांनी मूर्तीचे स्नान, त्यानंतर मूर्तीची महापूजा, मूर्तीची मंदिराला परिक्रमा केली जाईल. त्यानंतर सायंकाळी मूर्तीचा शय्याधिवास व वेदसेवा केली जाईल.

२२ जानेवारी : देवप्रबोधन करून त्यानंतर मूळगर्भगृहामध्ये श्रीरामलल्लाला सिंहासनावर बसवले जाईल. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त दुपारी १२ वाजून २९ मिनिटांचा आहे. त्यापूर्वीच देवाच्या खाली सुवर्ण-रत्न आदी ठेवले जातात. सुमुहूर्ताच्या वेळी मुख्य प्राणप्रतिष्ठा सूक्तांचे पठण होऊन मूर्तीखाली असलेली सुवर्णशलाका काढून देव प्रतिष्ठित केले जातात. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर सर्व देवतांचे उत्तरांग, हवन, पूर्णाहुती प्रासादोत्सर्ग होऊन सात दिवसांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.