अयोध्या- राम मंदिर परिसराचा विस्तार 70 एकरवरुन 107 एकरपर्यंत करण्यात येणार आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने या अंतर्गत राम जन्मभूमी परिसराजवळ 7,285 वर्ग फूट जमीन खरेदी केली आहे. ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, उत्तर प्रदेशच्या प्रसिद्ध शहरात भव्य राम मंदिराचे निर्माण करत असलेल्या ट्रस्टने 7285 वर्ग फूट जमिनीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.
ट्रस्टचे अधिकारी अनिल मिश्रा यांनी सांगितलं की, आम्ही याठिकाणी जमिनीची खरेदी केली कारण भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्हाला आणखी जागेची आवश्यकता होती. ट्रस्टने खरेदी केलेली ही जमीन अशरफी भवनच्या जवळ आहे.
अधिकारी एसबी सिंह यांनी सांगितलं की, जमिनीचे मालक दीप नरैन यांनी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्या समक्ष 7,285 वर्ग फूटच्या जमिनीच्या रजिस्ट्रीवर स्वाक्षरी केली आहे. मिश्रा आणि अपना दलचे आमदार इंद्र प्रताप तिवारी यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे. फैजाबादचे अधिकारी एसबी सिंह यांच्या कार्यलयामध्ये ही रजेस्ट्री करण्यात आली आहे. तिवारी म्हणाले की, राम मंदिराद्वारे पहिल्यांदा जमीन खरदेच्या प्रक्रियेचा भाग बनल्याने मला भाग्यशाली वाटत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ट्रस्टची योजना आणखी जमीन खरेदी करण्याची आहे. राम मंदिराजवळच्या जागा, मंदिर आणि खुल्या जागा खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भव्य मंदिर 107 एकर जागेवर निर्माण केले जाणार आहे. यासाठी 14,30,195 वर्ग फूट जागेची आवश्यकता लागणार आहे. मुख्य मंदिराचे निर्माण 5 एकर जागेवर केले जाणार आहे. इतर जागेवर संग्रहालय आणि पुस्तकालय अशी केंद्रे बनवली जाणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून देणगी गोळा केली जातेय.
दरम्यान, मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहेत. मंदिर बांधून तयार होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मंदिर तीन मजली असणार आहे. शिवाय मंदिर वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात येईल. मंदिराच्या शिखराची उंची वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. याशिवाय घुमटांची संख्या तीनवरुन पाच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिराच्या उंचीमध्ये 33 फूटांनी वाढ करण्यात येणार आहे. मंदिराच्या जून्या मॉडेलनुसार मंदिराची उंची 268 फूट होती. आता ती 280 ते 360 फूट करण्यात आलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.