रामनाथ कोविंद यांचा नवा पत्ता...सोनियांचे शेजारी!

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नवीन पत्ता‘ १२ जनपथ' हा असणार आहे. ते जपासून येथे राहण्यासाठी आले
Ram Nath Kovind new address 12 Janpath near congress Sonia Gandhi
Ram Nath Kovind new address 12 Janpath near congress Sonia Gandhi sakal
Updated on

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नवीन पत्ता‘ १२ जनपथ' हा असणार आहे. ते जपासून येथे राहण्यासाठी आले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाच्या बरोबर शेजारी असलेला हा बंगला माजी मंत्री रामविलास पासवान यांच्या ताब्यात होता व त्यांच्या निधनानंतर सरकारने तो ‘रिकामा‘ करवून घेतला होता. २०२० मध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर खासदार चिराग पासवान यांनी येथे त्यांचे स्मारक बनविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.त्यापूर्वीजवळपास तब्बल २ दशके हा बंगला पासवान यांनी पल्याकडे ठेवण्यात यश मिळवले होते. पासवान यांच्या निधनानंतर बंगला रिकामा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा चराग यांनी त्यांचा पुतळाही तेथे उभारला होता. मात्र चिराग यांना खासदार म्हणून आधीच वेगळा बंगला दिल्याने मोदी सरकारने सक्त भूमिका घेऊन हा बंगला रिकामा करवून घेण्यात आला.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नियमानुसार देशभरात कोठेही त्यांच्या इच्छेनुसार नवीन निवासस्थान मिळते. यापूर्वी राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यात घर घेतले होते तर प्रणव दादा मुखर्जी निवृत्तीनंतरही राजाजी मार्गावरील बंगल्यातच रहात होते. कोविंद यांनीही तूर्तास दिल्लीतच रहाण्याचे ठरविल्याचे दिसते. त्यानुसार त्यांना १२ जनपथ हा प्रशस्त बंगला देण्यात आला आहे. यात कोविंद यांच्यासाठी कार्लायलही असेल. कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनातील गार्ड आॅफ ॅनर समारंभात राष्ट्रपती भवनाचा निरोप घेतला. त्यानंतर ते १२-जनपथ येथे रहाण्यास आले. हा बंगला श्रीमती गांधी यांच्या निवासस्थानाच्या शेजारीच आहे. मात्र दोन्ही बंगल्यांची परवेशद्वारे वेगवेगळी आहेत. श्रीमती गांधी यांच्याकडे जाण्यासाठी अकबर रस्त्यावरील प्रवेशद्वारातून जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()