Ayodhya Temple : राममंदिर जानेवारी २०२४ मध्ये भाविकांसाठी खुलं होणार

हे मंदिर बांधण्यासाठी एकूण १८०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
Ayodhya Shri Ram Temple
Ayodhya Shri Ram Templeesakal
Updated on

अयोध्येमध्ये सध्या राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. हे मंदिर लवकरच आता भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. या विषयीची मोठी अपडेट आता समोर येत आहेत. हे मंदिर जानेवारी २०२४ मध्ये खुलं करण्यात येणार आहे.

या मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. २०२४ च्या मकर संक्रांतीदिवशी ही स्थापना होईल, त्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याविषयीची माहिती दिली आहे. हे मंदिर भूकंपापासून सुरक्षित असेल तसंच ते १००० वर्षांपर्यंत टिकणारं असेल.

या मंदिराला ३९२ खांब आहे तसंच १२ दारं आहेत. यामध्ये कोणत्याही लोखंडी सळीचा वापर करण्यात आलेला नाही. लोखंडाच्या ऐवजी तांब्याच्या पत्र्यांचा वापर करून दगड जोडण्यात आले आहेत. मुख्य मंदिराचा आकारा ३५० x २५० फूट असेल. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरुन या मंदिराचा आणि परिसराचा अभ्यासही करण्यात येणार आहे. हे मंदिर बांधण्यासाठी एकूण १८०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.