रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारकडं सेक्स सीडी स्कँडल प्रकरणाची (CD Scandal Case) चौकशी सीबीआयकडं (CBI) देण्याची मागणी केलीये.
बेळगांव : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांना केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सर्व पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी आतापासूनच सुरु केली असून एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडत आहेत.
त्यातच आता भाजपचे आमदार आणि बेळगावातील नेते माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारकडं सेक्स सीडी स्कँडल प्रकरणाची (CD Scandal Case) चौकशी सीबीआयकडं (CBI) देण्याची मागणी केलीये. यासाठी त्यांनी खास पत्रकार परिषद घेतली. याद्वारे त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार यांच्यावर आरोप केले. सेक्स सीडी कांडामध्ये राज्यातील शेकडो नेते, बेंगळुरुतील बडे-बडे अधिकारी अडकले आहेत. माझ्याकडं 120 जणांचे पुरावे आहे, असा गौप्यस्फोट जारकीहोळींनी केलाय.
या प्रकरणात महिलेसह माजी पत्रकार नरेश आणि सहा लोकांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीये. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी कट रचला होता आणि माझा व्हिडीओ बनविला होता, असा आरोपही त्यांनी केलाय.
मी गेली दीड वर्ष वाट पाहत आहे, शिवकुमार यांनी सीडी बाहेर काढून माझं आयुष्य बरबाद केलंय. कोणतीही चूक केली नाही, तरीही भोगावं लागतंय. मी माझ्याकडील पुरावे सीबीआयला देईन. 1985 मध्ये हेच शिवकुमार आणि मी राजकारणात आलेलो. मी रॅडोचे घड्याळ घालायचो, तर शिवकुमार माझ्याकडं फाटक्या चपलानं आलेले. आता त्यांच्याकडं हजारो कोटींची मालमत्ता आहे, असा आरोपही जारकीहोळींनी केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.