Explosion in Bengaluru cafe : रामेश्वरम कॅफेमधील स्फोट प्रकरणी २ फरार आरोपी ताब्यात; एनआयएला मोठं यश

Explosion in Bengaluru cafe : गेल्या काही महिन्यांपासून शाबिजने पळ काढला होता. आता आसाम आणि पश्चिम बंगालसोबतच्या एका संयुक्त ऑपरेशनअंतर्गत एनआयएने शाबिजला अटक केली आहे.
Bengaluru Rameshwaram cafe blast
Bengaluru Rameshwaram cafe blastesakal
Updated on

बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोट प्रकरणातील एनआयएला मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीला पकडण्यात आलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन फरार आरोपींना कोलकाता जवळून अटक केली. 1 मार्च रोजी बेंगळुरू कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते.

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी

अदबुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब यांचा कोलकाताजवळील त्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यांना पकडण्यात एनआयए टीमला यश आलं. आपली ओळख लपवून ते कोलकाताजवळ वास्तव्य करत होते असं एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

एनआयएने दोन वॉण्टेड आरोपींवर प्रत्येकी १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.

Bengaluru Rameshwaram cafe blast
Rameshwaram Cafe blast case : रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात; संशयितांशी कनेक्शन...

गेल्या महिन्यात, एनआयएने ताहा आणि शाजीब यांचे फोटो आणि तपशील जारी केले होते. या दोघांवर प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. शाजीब याने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि ताहा हा स्फोटाची योजना आणि अंमलबजावणी, त्यानंतर कायद्याच्या तावडीतून पळून जाण्याचा मास्टरमाईंड आहे," अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

Bengaluru Rameshwaram cafe blast
Rameshwaram Cafe : रामेश्वरम कॅफेचं प्रकरण ताजं असताना कर्नाटक-आंध्रप्रदेश सीमेवर बाराशे जिलेटिनच्या कांड्या अन् डिटोनेटर जप्त

एनआयएने केंद्रीय गुप्तचर संस्था आणि पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळच्या राज्य पोलिस यंत्रणांशी समन्वय साधला.

एनआयएने सांगितले की 300 हून अधिक कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपालल्यानंतरअसे आढळून आले की, 2020 मध्ये सुरक्षा एजन्सीच्या रडारवर आलेल्या शाजीब आणि ताहा या दोन इसिस सदस्यांनी हा स्फोट घडवून आणला होता.

Bengaluru Rameshwaram cafe blast
Rameshwaram Cafe blast case: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात; एनआयएची कारवाई- रिपोर्ट

एनआयएने या प्रकरणात आणखी दोघांना आरोपी म्हणून सांगितले आहे. त्यापैकी एक, माझ मुनीर अहमद (26) हा घटनेच्या वेळी तुरुंगात होता. अन्य आरोपी मुझम्मिल शरीफ, याला 27 मार्च रोजी एनआयएने सेल फोन, बनावट सिम कार्ड आणि स्फोटाची योजना आखण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी वापरली जाणारी इतर सामग्री पुरवल्याबद्दल अटक केली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तपासात असेही समोर आले आहे की, ताहाने या ऑपरेशनला पैसा पुरवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला. ताहाने 1 मार्चच्या कॅफे स्फोटासाठी लॉजिस्टिकची व्यवस्था करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी मुझम्मील शरीफला हस्तांतरित करण्यासाठी भारताच्या विविध भागांमध्ये चोरलेल्या आणि आयएसआयएस कारणांसाठी भरती केलेल्या लोकांच्या ओळखपत्रांसह विविध साधनांचा वापर केला होता, अशी माहिती एका आधिकाऱ्यांने दिली आहे.

Bengaluru Rameshwaram cafe blast
Bengaluru Rameshwaram Cafe Blast: ‘आईचा फोन आला, मी काऊंटरपासून पुढे…’, तितक्यात मोठा स्फोट अन्..., इंजिनिअरने सांगितला भयानक अनुभव

रामेश्वरम कॅफेमध्ये काय घडलं होतं?

1 मार्च रोजी एक व्यक्ती रामेश्वरम कॅफेमध्ये आला होता. त्याने आपल्या जवळील एक बॅग कॅफेतच ठेवली. त्यानंतर तो कॅफेतून बाहेर पडला. त्यानंतर जवळपास एक तासाने कॅफेमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले होते. बेंगळुरुमधील रामेश्वरम कॅफे हा प्रसिद्ध आहे. कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.