PM Modi : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोदींनी शबरीचा उल्लेख केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ तारखेला अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यात बोलताना रामायणातील शबरीचा उल्लेख केला होता. त्यानंतर सोमवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.
PM Modi : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोदींनी शबरीचा उल्लेख केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले...
Updated on

PM Narendra Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ तारखेला अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यात बोलताना रामायणातील शबरीचा उल्लेख केला होता. त्यानंतर सोमवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी मोदींना पत्र लिहून समाधान व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर छत्तीसगडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शबरी एक आदिवासी महिला होती, तिने मनाशी दृढ विश्वास केला होता की राम वनवासात असताना तिच्याकडे येतील.

मुख्यमंत्री पुढे लिहितात, मी जेव्हा आई शबरीबद्दल विचार करतो, तेव्हा माझ्यातही एक विश्वास जागा होतो. आई शबरीकडे एक विश्वास होता की, राम येतील आणि राम आले.

PM Modi : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोदींनी शबरीचा उल्लेख केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले...
Anti Drone System: अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल पुरवणार सुरक्षा कवच; अशी असेल 'अँटी ड्रोन सिस्टिम'

''शबरीची भक्ती, प्रेम आणि समर्पणाची भावना एका गौरवशाली आणि दिव्य भारताची ओळख आहे. शबरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सुंदर शब्द वापरले ते ऐकून शबरी धाममध्ये राहणाऱ्या हजारो लोक तसेच छत्तीसगड आणि वन क्षेत्रातील कोट्यवधी लोकांच्या काळजात घर केलं.'' अशा भावना छत्तीसगडच्य मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

PM Modi : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोदींनी शबरीचा उल्लेख केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले...
Rajinikanth daughter Aishwarya: तिनं कधीही 'तो' शब्द वाईट आहे असं म्हटलं नाही, मुलीसाठी रजनीकांत आले धावून! नेमकं घडलं काय?

मुख्यमंत्री पुढे म्हणतात, आमचं भाग्य आहे की, प्रभू श्रीरामांनी आपल्या सगळ्यांसाठी रामराज्याचं आदर्श उदाहरण प्रस्थापित केलं आहे. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने आम्ही आदिवासी समूहांमध्ये केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा विस्तार करणार आहोत. असं म्हणत त्यांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.