राणा गुरमितसिंग सोधी यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

फिरोझपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली.
राणा गुरमितसिंग सोधी यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
Updated on
Summary

फिरोझपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची(punjab election) रणधुमाळी सुरू झाली असून माजी मंत्री राणा गुरमितसिंग सोधी(rana gurmitsing sodhi) यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्षाचे अध्यक्ष जे. पी.नड्डा(j.p. nadda) यांच्या उपस्थितीत त्यांनी आज दिल्लीत(delhi) कमळ हाती घेतले.राणा सोधी हे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग(amrindar singh) यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. अमरिंदरसिंग यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी होताच सोधी यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होती. अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सोधी हे काँग्रेस सोडणारे दुसरे मोठे नेते ठरले आहेत. ते आता फिरोझपूरमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली.

राणा गुरमितसिंग सोधी यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
हिवाळी अधिवेशाआधी पटोलेंनी गाठली दिल्ली, अध्यक्षपदासाठी खलबतं

अमरिंदर यांच्या सल्ल्यानेच सोधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सोधी यांनी म्हटले आहे की, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला वैतागून पक्ष सोडत आहोत. या संघर्षामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळली असून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मजिठियांविरोधात गुन्हा दाखल

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पंजाब ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने ही कारवाई केली आहे. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.