मोदीजी जनतेला तुमचे 'अच्छे दिन' नको आहेत; काँग्रेसचा हल्लाबोल

Randeep Singh Surjewala
Randeep Singh Surjewalaesakal
Updated on
Summary

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं पुन्हा एकदा केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय.

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं (Congress) पुन्हा एकदा केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) वाढत्या किमतीवरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी मोदी सरकारवर (Modi government) निशाणा साधला असून भाजपनं (BJP) देशात सर्वात मोठी महागाई आणल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, 'आता लोकांना पीएम मोदींचे अच्छे दिन नको आहेत, तर त्यांना पूर्वीसारखे दिवस हवे आहेत.'

सुरजेवाला यांनी ट्विट करुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, देशात महा-महागाई भाजपनं (Petrol Diesel Hike in India) आणलीय. आता गॅस सिलिंडरच्या दरातही त्यांनी 50 रुपयांची वाढ केलीय. दिल्ली-मुंबईमध्ये (Mumbai) त्याची किंमत 949.50 रुपये आहे, तर लखनऊमध्ये 987.50 रुपये, कोलकाता 976 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये आहे. त्यामुळं आता लोकांना मोदींचे अच्छे दिन नको असून त्यांना स्वस्त दिवस हवे आहेत. दरम्यान, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आलीय, तर घरगुती एलपीजीच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. आजपासून (मंगळवार) 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. काही महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढण्यात आले आहेत. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपये झालीय. पूर्वी ते 899.50 रुपये होते.

Randeep Singh Surjewala
LPG Price Hike : दूध, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरही झाला महाग

'या' शहरांत दर खूप जास्त

पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकातामध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 976 रुपयांवर पोहोचलीय. यापूर्वी कोलकात्यात त्याची किंमत 926 रुपये होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 987.5 रुपयांवर पोहोचलीय. तर, पाटण्यात 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1047.5 रुपयांवर पोहोचली आहे.

Randeep Singh Surjewala
रामायण मंदिरासाठी मुस्लिम व्यक्तीनं 2.5 कोटींची जमीन केली 'दान'

पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागलं

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झालीय. त्यामुळं दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटरवरून 96.21 रुपये प्रति लिटर झालाय. तर दुसरीकडं एक लिटर डिझेलचा दर 86.67 रुपयांवरून 87.47 रुपये प्रति लिटर झाला आहे. याआधी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.