RSS on Caste Census: जातनिहाय जनगणनेसाठी RSS कडून हिरवा कंदील; संघाने नेमकी काय घेतली भूमिका?

RSS backed Caste Census: राजकारणाच्या पलीकडे जाऊन जातीय जनगणनेवर विचार व्हावा. या मुद्द्यावर राजकारण व्हायला नको.हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे.
rss mohan bhagwat
rss mohan bhagwat
Updated on

केरळ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. जातीनिहाय जनगणना याबाबत देखील त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्या समाजाच्या प्रगतीसाठी आकडे आवश्यक असतील तर याला संघाची हरकत नाही, असं आंबेकर म्हणाले आहेत. ते केरळ येथे बोलत होते.

सुनील आंबेकर म्हणाले की, कोणाच्या प्रगतीसाठी आकडे वगैरे आवश्यक असेल तर जातीगत जनगणना व्हायला हरकत नाही. यापूर्वी सुद्धा अशी आकडेवारी गोळा झाली आहे. जातीय जनगणनेचे राजकारण नको. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जातीय जनगणनेवर विचार व्हावा. या मुद्द्यावर राजकारण व्हायला नको. हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे.

rss mohan bhagwat
Mohan Bhagwat : 'भोग-उपभोगामुळे पाश्चात राष्ट्रे विकृतीकडे चाललीयेत'; RSS सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.