Wakeel Hassan: बोगदा दुर्घटनेत रॅट मायनर म्हणून मजुरांचे वाचवले प्राण अन् आज प्रशासनानं केलं बेघर

पोलिसांनी छोट्या मुलाला मारहाण केल्याची तक्रारही या कामगारानं केली आहे.
Wakeel Hasan house razed
Wakeel Hasan house razed
Updated on

नवी दिल्ली : उत्तरकाशीच्या बोगदा दुर्घटनेत अडकून पडलेल्या 41 कामगारांना 17 दिवसांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या रॅट मायर्नसपैकी एक वकील हसन यांचं दिल्लीत राहतं घर स्थानिक प्रशासनानं अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत जमीनदोस्त केलं आहे. यामुळं हसन हे नाराज असून आपल्या मुलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (rat miners wakeel hassan who were part of uttarkashi tunnel rescue operation his house razed by dda)

रॅट मायनर वकील हसन यांनी सांगितलं की, "मला खूपच वाईट वाटलं आहे, की माझं घर जमीनदोस्त केलं आहे. माझ्यासोबतच हे का घडलं आहे हेच मला कळत नाहीए. आम्ही बोगदा दुर्घटनेत इतकं चांगलं काम केलं पण त्याबदल्यात मला घर उद्ध्वस्त केल्याचं फळ मिळालं आहे. यासाठी उत्तराखंड सरकारनं आम्हाला ५०,००० रुपयांचं बक्षीस दिलं होतं. पण आज याची किंमत शून्य आहे. (Latest Maharashtra News)

Wakeel Hasan house razed
Farmer's Protest: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा होणार रद्द! हरयाणा पोलिसांचा इशारा

आता माझ्या मुलाबाळांना घेऊन मी कुठे जाऊ? मला रोजीरोटीसाठी पैसा मिळवताना खूपच कष्ट करावे लागत आहेत, मी नवं घर कसं विकत घेऊ? आमच्यावर खूप मोठं कर्ज आहे, मला माझ्या मुलांना जगवायचं देखील आहे. आता आमच्याकडं केवळ जीव देणं हाच पर्याय उरला आहे. माझं घर पाडण्यासाठी आलेल्या लोकांना मी याचं कारण विचारलं पण त्यांनी यावर काहीच उत्तर दिलं नाही, कुठलीही कागदपत्रे दाखवली नाहीत. (Latest Maharashtra News)

Wakeel Hasan house razed
Pakistani Air Hostess: पाकिस्तानच्या 9 एअर होस्टेस गायब! 'थँक्यू PIA' असा मेसेज लिहित कॅनडाकडं केलं उड्डाण अन्...

माझ्या मुलांना मी कारवाई दरम्यान पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पाठवलं पण पोलिसांनी माझी मुलं, बायको यांना पोलिसांनी स्टेशनमध्येच थांबवून ठेवलं. इथं पोलिसांकडून माझ्या मुलाला मारहाण करण्यात आली यात तो जखमी देखील झाला आहे. बोगदा दुर्घटनेतील आमच्या कामगिरीसाठी संपूर्ण जग आमचं कौतुक करत असताना माझ्यासोबत हे घडलं आहे, असंही वकील हसन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.