Ratan Tata : उद्योगपुरुष : रतन नवल टाटा १९३७ - २०२४

रतन टाटा.. हे केवळ नाव नव्हते तर ती एक संस्था होती. केवळ नफ्यासाठी उद्योग न करता राष्ट्रउभारणीत भरीव योगदान देणाऱ्या या लक्ष्मीपुत्राने ‘टाटा’ हा ब्रँड जगभर नेला.
Ratan-tata
Ratan-tatasakal
Updated on

रतन टाटा.. हे केवळ नाव नव्हते तर ती एक संस्था होती. केवळ नफ्यासाठी उद्योग न करता राष्ट्रउभारणीत भरीव योगदान देणाऱ्या या लक्ष्मीपुत्राने ‘टाटा’ हा ब्रँड जगभर नेला एवढेच नव्हेतर अनेक बड्या परकी ब्रँडला त्यांनी स्वतःच्या छत्रछायेखाली घेतले. या उद्योगपुरुषाने अनेक समाजोपयोगी उपक्रमांचीही सुरूवात केली. जमशेटजी टाटा यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या टाटा उद्योगसमूहाला जेआरडींनी मोठे बळ दिले. पुढे रतन टाटांनी हा ब्रँड विश्वव्यापी केला.

रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. सत्तेत असणाऱ्यांनाही आरसा दाखविण्याचे धाडस त्यांच्यात होते. त्यांचा दृष्टिकोन आणि मानवता हा त्यांच्या अनेक कामांमध्ये प्रतिबिंबित झाला आहे. अनेक प्रसंगांमध्ये त्यांच्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली.

- डॉ. मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

भारतातील अनेक उद्योग समूहांपैकी टाटा समूहाचे मला विशेष कौतुक वाटते. समर्पण, नेतृत्व आणि एकात्मता या गुणांच्या जोरावर रतन टाटा यांनी या समूहाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. जे. आर. डी. टाटा यांचे सच्चा वारस असल्याचे त्यांनी कृतीतून सिद्ध केले होते.

- लालकृष्ण अडवानी, भाजपचे ज्येष्ठ नेते

रतन टाटा यांच्यासारखा प्रिय मित्र गमावल्याचे अत्यंत दु:ख वाटत आहे. मूल्यांना जपत नेतृत्व करण्याच्या बाबतीत ते माझे रोल मॉडेल होते. याबाबतीत मला कधी संभ्रम पडल्यास त्यांनी मला मार्ग दाखविला आहे.

- नारायण मूर्ती, संस्थापक, इन्फोसिस

शब्द ‘रतन’

काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत. आपणच आपली मानसिकता आणि कार्यपद्धती कालसुसंगत केली पाहिजे.

खूप चांगले यश मिळणाऱ्या लोकांचा मी एक प्रशंसक नक्कीच आहे; परंतु हे यश जर त्यांनी निर्दयी मार्गांचा अवलंब करून मिळविलेले असेल, तर मी अशा लोकांची प्रशंसा करेन; पण त्यांचा आदर करू शकणार नाही.

मला माझ्या देशाचा अभिमान आहे. तो जाती आणि धर्मभेदापासून मुक्त असावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. जिथे प्रत्येकाला समान संधी मिळेल असे राष्ट्र आपण निर्माण करायला हवे.

आपल्याला गरज आहे ती समविचारी कंपन्यांनी एकत्र येण्याची आणि ‘कन्सॉरशियम’ म्हणून एकत्र काम करण्याची. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुकाबल्यासाठी ते आवश्यक आहे.

या ब्रँडवर मोहोर

  • स्टारबक्स

  • जग्वार

  • लँड रोव्हर

  • टाइम व्हॅली

  • झारा इंडिया

  • नॅटस्टील

  • विदेश संचार निगम

  • टेटली

  • कोरस

  • सीटीग्रुप

  • फॅव्हर लुबा

  • टेलिग्लोब

  • ह्यूज टेलिकॉम

  • एट ओ क्लॉक

  • कॉफी

टाटा समूहाचा परदेशातील विस्तार

  • इंडियन हॉटेल्स : स्टारवूड ग्रुप, ऑस्ट्रेलिया

  • टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स : वुंड्‍श वेईडिंगर, जर्मनी

  • टाटा केमिकल्स : इंडो मरॉक फॉस्फर, मोरोक्को

  • टाटा केमिकल्स : ब्रुनर माँड ग्रुप, इंग्लंड

  • टाटा कॉफी : एट ओ क्लॉक कॉफी कंपनी, अमेरिका

  • टाटा मोटर्स : देवू कमर्शिअल व्हेईकल कंपनी, कोरिया

  • टाटा मोटर्स : हिस्पानो कॅरोसेरा, स्पेन

  • टाटा स्टील : नॅटस्टीलचा पोलाद उद्योग, सिंगापूर

  • टाटा स्टील : मिलेनियम स्टील, थायलंड

  • टाटा टी : टेटली, इंग्लंड

  • टाटा टी : गुड अर्थ कॉर्पोरेशन, अमेरिका

  • टाटा टी : जेईएमसीए, चेक प्रजासत्ताक

  • टाटा टी : ग्लेशियूमधील ३० टक्के भाग, अमेरिका

  • टाटा टेक्नोलॉजीस : आयएनसीएटी इंटरनॅशनल, इंग्लंड

  • टीसीएस : फायनान्शियल नेटवर्क सर्व्हिसेस, ऑस्ट्रेलिया

  • व्हीएसएनएल : जेमप्लेक्स, ऑस्ट्रिया

  • व्हीएसएनएल : टायको ग्लोबल नेटवर्क, अमेरिका

  • व्हीएसएनएल : टेलिग्लोब इंटरनॅशनल होल्डिंग्ज, बर्म्युडा

वारसदार कोण?

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे नेतृत्व कोण करणार? याबाबतीत अनेक वर्षांपासून चर्चा रंगत आली होती. रतन टाटा यांच्याकडे वैयक्तिकरीत्या तीन हजार ८०० कोटींची मालमत्ता आहे. टाटा यांच्या एकूण उत्पन्नापैकी ६६ टक्के भाग हा टाटा ट्रस्ट व त्याअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांमधून येतो. टाटा ट्रस्ट हे टाटा सन्सचा भाग असून त्याअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. रतन टाटा यांना मूलबाळ नसल्याने वारसदार म्हणून टाटा घराण्यातील काही सदस्यांची नावे चर्चेत आहेत.

नोएल टाटा

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव नोएल टाटा यांचे नाव टाटा समूहाचे वारसदार म्हणून आघाडीवर आहे. नोएल हे सध्या ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.

नेविल टाटा

नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले नेविल टाटा हे ट्रेंट लिमिटेड अंतर्गतच्या स्टार बझार, झुडिओ या व्यवसायाची धुरा सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वात ‘झुडिओ’ने अल्पावधीत भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळविला. नेविल यांचा मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह झाला असून त्यांच्या मुलाचे नाव जमशेद टाटा आहे.

लेह टाटा

नोएल टाटा यांची थोरली कन्या लेह टाटा यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६ मध्ये ताज हॉटेल व रिसॉर्ट्समध्ये सहायक विक्री व्यवस्थापक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या त्या टाटा हॉटेल समूहाच्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीचीही धुरा लेह यांच्याकडे असून त्याअंतर्गत विविध हॉटेलचा कारभार सांभाळला जातो.

माया टाटा

नोएल टाटा यांची धाकटी कन्या माया या टाटा मेडिकल सेंटरच्या ट्रस्टी आहेत. माया यांच्याकडे टाटा अपॉर्च्युनिटीज फंड, टाटा डिजिटलची धुरा आहे. माया यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने ‘टाटा नेऊ’ ॲप सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.