आता TATA बनवणार iPhone, लवकरच होणार घोषणा

टाटा आयफोन बनविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तशी सध्या बाजारात चर्चा सुद्धा आहे.
ratan tata
ratan tatasakal
Updated on

टाटा समूह ही भारतासह जगभरातला नावाजलेली आहे. टाटासमुह नेहमी वेगवेगळ्या गुंतवणूकीसाठी चर्चेत येत असतो. सध्या टाटा समूह एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. जे ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल. टाटा आयफोन बनविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तशी सध्या बाजारात चर्चा सुद्धा आहे.

सध्या टाटा समूह भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी तैवानच्या पुरवठादारांशी चर्चा करत आहे. जर ही चर्चा शेवटपर्यंत गेली तर टाटा आयफोन बनविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ratan tata
जमशेदजी टाटा जयंती : Ratan Tata झाले भावूक म्हणाले...

विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह आयफोन बनवतात. पण टाटाने जर आयफोन बनविला तर याचा खुप मोठा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिट कंपन्यांना बसणार.

असं म्हणतात, टाटा समूह विस्ट्रॉनच्या इंडिया ऑपरेशन्समध्ये इक्विटी खरेदी करण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे आल्या तर ऍपल आयफोन एकत्र येऊ शकतात. ब्लूमबर्गने यासंदर्भात शुक्रवारी माहिती दिली.

ratan tata
Ratan Rajput : तो जंगलात ओढत होता अन् लोक तमाशा बघत होते; रतनने सांगितली घटना

हा करार चीनला का आव्हान देणारा आहे?

कोरोनाकाळापासून चीन आणि अमेरिकेचे संबंध तणावपुर्ण आहे. याचा आर्थिक दृष्ट्या मोठा फटका चीनला बसलाय. यात जर भारताने विस्ट्रॉन सोबत करार करुन आयफोन तयार केला तर इतर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सला चीनवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.