बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमध्ये रतन टाटा; दिग्गज उद्योगपतीच्या साधेपणाचा Video Viral

Ratan Tata
Ratan Tataesakal
Updated on
Summary

ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात.

नवी दिल्ली : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. रतन टाटांच्या (Ratan Tata) नम्रता आणि साधेपणाचे किस्से आपण वेळोवेळी ऐकत असतो. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये हे दिग्गज उद्योगपती एका छोट्या कार नॅनोमध्ये कोणत्याही बॉडीगार्डशिवाय बसले आहेत.

या व्हिडिओमध्ये रतन टाटा कोणत्याही बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमधून प्रवास करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडं सामान्य माणसालाही स्वतःसाठी महागडी आणि आलिशान कार घ्यायची आहे, तर दुसरीकडं कोट्यवधी रुपये असलेले रतन टाटा नॅनोमधून (Tata Nano) फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर रतन टाटांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

Ratan Tata
'हे' दोन पदार्थ खाल्ल्यामुळं 128 वर्षीय महिलेला मिळालं 'दीर्घायुष्य'

सुप्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट विरल भियानी (Viral Bhayani) यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. भियानी यांनी व्हिडिओसोबत लिहिलंय की, 'आमच्या अनुयायांपैकी एक असलेल्या बाबा खान यांनी रतन टाटा यांना ताज हॉटेलच्या (Taj Hotel) बाहेर पाहिलं. रतन टाटा यांचा साधेपणा पाहून आश्चर्यचकित झाल्याचं बाबांनी सांगितलं. कारण, त्यांच्यासोबत कोणीही अंगरक्षक नव्हता. फक्त हॉटेल कर्मचारी आणि रतन टाटा त्यांची छोटी कार टाटा नॅनोमध्ये बसले होते, असं त्यांनी नमूद केलंय.

Ratan Tata
'नटून थटून लाजते जणू चांदणी' PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात

2008 मध्ये रतन टाटांनी नॅनो कार लॉन्च केली, तेव्हा जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या कमी बजेटमध्ये सर्वात स्वस्त कार कशी मिळेल, याचा लोक विचार करत होते. केवळ एक लाख रुपये खर्च करुन सामान्य माणूसही ती कार सहज खरेदी करू शकतो, अशी त्यांची भावना होती. स्वस्त कारचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही कार बनवण्यात आली होती. 2009 मध्ये टाटा नॅनो पहिल्यांदाच रस्त्यावर दिसली आणि त्यानंतर 2019 मध्ये टाटा नॅनो रस्त्यांवरून गायब झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.