Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?

Tata trust: बुधवारी रतन टाटा यांचं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु काळ जिंकला अन् रतन टाटांचे श्वास थांबले. गुरुवारी वरळीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडत आहेत.
Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?
Updated on

Ratan Tata Dog Pet: रतन टाटा यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत होतं. श्वानांसाठी त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये विशेष सोय केली होती. एवढंच नाही तर मुंबईत त्यांनी श्वानांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु केलं. पण त्यांच्या लाडक्या गोवा श्वानाची गोष्टच वेगळी आहे. त्या श्वानालाही आज रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलेलं होतं. तेही टॅक्सीने. पोलिसांनी टॅक्सी अडवली पण माहिती दिल्यानंतर गाडी आतमध्ये सोडली.

मागे एकदा रतन रतन टाटांनी इन्स्टाग्रावर त्यांच्या लाडक्या गोवा श्वानासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यात त्यांनी श्वानांसोबतच्या आनंदी क्षणांबद्दल लिहिलं होतं. शिवाय पोस्टमध्ये त्यांनी ''गोवा माझा ऑफिस पार्टनर'' असं म्हटलं होतं.

त्याचा खुलासा करताना रतन टाटा म्हणाले होते की, हे कुत्र्याचे पिल्लू लहान होतं तेव्हा इकडे-तिकडे फिरत होतं. अचानक ते माझ्या एका सहकाऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसलं.. ते आमच्यासोबत बॉम्बे हाऊसमध्ये आलं.. तो गोव्यावरुन सोबत आल्याने त्याचं नाव गोवा ठेवलं.

बुधवारी रतन टाटा यांचं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु काळ जिंकला अन् रतन टाटांचे श्वास थांबले. गुरुवारी वरळीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडत आहेत.

Ratan Tata : भावुक क्षण! रतन टाटांच्या लाडक्या 'गोवा' ने घेतले अंत्यदर्शन; काय आहे हृदयस्पर्शी कहाणी?
Nobel Prize 2024 : यंदा साहित्य क्षेत्रातील नोबेलच्या मानकरी ठरल्या दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग,या रचनेसाठी दिला गेला पुरस्कार

रतन टाटांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या खास गोवा श्वानाला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. विशेष म्हणजे दोन कर्मचारी त्याला टॅक्सीतूनच घेऊन आले होते. पोलिसांनी गेटवरच टॅक्सी रोखली. पण माहिती दिल्यानंतर टॅक्सी आतमध्ये सोडली.

त्यानंतर गोवा श्वानाने आपल्या प्रेमळ मालकाचं अंत्यदर्शन घेतलं. हा भावुक क्षण माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपला. माणसांप्रमाणे प्राण्यांवर जीव लावणाऱ्या रतन टाटांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला आहे. असं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, अशाच सर्वांच्या प्रतिक्रिया आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.