भारताचे रत्न असलेले रतन टाटा यांचे निधन झाले आहे. रतन टाटा हे देशातले मोठे उद्योगपती आणि टाटा इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा होते. जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत असूनही या व्यक्तीने कधीही पैशांचा माज केला नाही. नेहमी साध्या कपड्यात आणि त्यांच्या साध्या स्वभावामुळे ते ओळखले जायचे.
प्रत्येकजण एखादा प्राणी पाळतो, त्याची काळजी घेतो. श्रीमंत व्यक्तीने कुत्रा पाळला तर त्याला सांभाळण्यासाठी माणसं ठेवलेली असतात. आपण पाळलेल्या कुत्र्याची काळजी घेतो पण रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस कुत्र्यांची काळजी रतन टाटा यांनी घेतली. त्यांना बेवारस सापडलेल्या श्वानांसाठी त्यांनी पालकही शोधले.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी समोर येत आहे. रतन टाटांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. एका आजारी कुत्र्याच्या काळजी घेण्यासाठी त्यांनी चक्क ब्रिटनचा तत्कालीन प्रिन्स चार्ल्सयांचीही भेटही टाळली होती. नेमकी काय होती ती गोष्ट, जाणून घेऊयात.
गोष्ट 2018 मधील फेब्रुवारी महिन्यातील आहे. तेव्हा बंकिंघममधील शाही पॅलेसमध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला होता. तत्कालीन राजकुमार प्रिन्स चार्ल्सने हा कार्यक्रम आयोजिक केला होता. भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना द्यायचा होता.
पण रतन टाटा या कार्यक्रमाला जाऊ शकले नव्हते. याचं कारण त्यांचा एक कुत्रा होता. उद्योगपती सुहेल सेठ यांनी हा किस्सा काही दिवस आधीच आधीच प्रकाशझोतात आणला आहे. सोहेल यांनी रतन टाटा यांच्या प्राण्यांवरचे हे प्रेम जगासमोर आणलं.
सोहेल यांनी सांगितलं की या कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी २ किंवा ३ फेब्रुवारीला लंडनला पोहोचलो होता. जेव्हा ते लंडन विमानतळावर उतरले तेव्हा त्यांना रतन टाटा यांचे फोनवर ११ मिस्ड कॉल आले होते. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतके मिसकॉल पाहून तो थोडं आश्चर्यचकित झाला आणि विमानतळावर बॅग उचलल्यावर लगेच टाटांना फोन लावला.
पुढे ते म्हणाले की, 'त्यांचा एक कुत्रा टँगो किंवा टिटो खूप आजारी पडला होता. त्यानी मला सांगितले की मी त्याला अशा आजारी अवस्थेत सोडून तिथे येऊ शकत नाही. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी प्रिन्स चार्ल्सचे नाव सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण रतन टाटा यायला राजी झाला नाही. टाटा त्यांचा पुरस्कार घेण्यासाठी त्या कार्यक्रमाला आले नव्हते.
सुहेल सेठ यांनी रतन टाटा कार्यक्रमाला न येण्यामागचे कारण ऐकल्यावर प्रिन्स चार्ल्स काय म्हणाले याबद्दल सांगितले. प्रिन्स चार्ल्स त्यांना म्हणाले की, 'माणूस कसा असावा याचं उत्तम उदाहरण रतन टाटा आहेत, ते एक अद्भुत व्यक्ती आहेत, असे प्रिन्स म्हणाले.
या वर्षी जुलैमध्ये टाटा समुहाने मुंबईत एक लहान प्राण्यांसाठीचे हॉस्पिटल सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये तपासणीपासून संपूर्ण ऑपरेशनसारख्या सुविधा आहेत. हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.तसेच, किचकट ऑपरेशन्स, दुर्मिळ आजार यावरही उपचार कराणारे अनुभवी तज्ज्ञ या हॉस्पिटलमध्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.