नवी दिल्ली
विविध भारतीय पेमेंट गेटवे कंपन्या आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) अमंलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) स्कॅनरखाली आले आहेत. या कंपन्यांनी सट्टेबाजीसाठीच्या (Betting apps) अॅपवर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी परवानगी दिली आहे. तपासात हे समोर आलंय की अनेक भारतीय लोक चीनी बेटिंग अॅपवरुन सट्टेबाजी करत होते. याद्वारे केमन बेटांवर (युके) पैसे पाठवले जात होते. इकॉनॉमिक टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.
ईडीनं पेमेंट गेटवे कंपन्यांविरोधात PMLA कायद्यांर्गत कारवाईचा बडगा उगारणं हे पहिल्यांदाच घडत आहे. भारतीयांकडून कुठलंही ऑनलाईन पैसे पाठवताना एखाद्या पेमेंट गेटवेच्या मार्फतच पाठवले जातात. याप्रकरणात चौकशी करणाऱ्यांना आढळून आलंय की, पेमेंट गेटवे कंपन्यांनी चीनी अॅप्सना कोणतीही चौकशी न करता व्यवहारांसाठी परवानगी दिली. या कंपन्यांना प्रश्न विचारण्यात आला की त्यांनी भारतीयांना चीनी अॅपवर बेटिंग करायला परवानगीच कशी दिली. तर इतर पेमेंट कंपन्या जसे Cashfree, PayTm, Bill Desk आणि Infibeam Avenues या कंपन्यांची देखील ईडी मार्फत तपासणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी Cashfree च्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "इतर काही पेमेंट गेटवे कंपन्यांची बंगळुरूच्या ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. आम्ही ईडीला पूर्ण सहकार्य केलं असून त्यांना पाहिजे असलेली सर्व माहितीही दिली आहे. ईडीचे अधिकारी आमच्या प्रोटोकॉलवर समाधानी आहेत"
दरम्यान, भारतीय फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टच्या नियमावलीनुसार, पेमेंट गेटवेंनी आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी कुठल्याही व्यवहारांची प्रक्रिया करताना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.