Shaktikanta Das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सर्वोच्च बँकरचा सन्मान

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स या मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च बँकर म्हणून गौरविले
RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta DasSakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स या मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च बँकर म्हणून गौरविले आहे. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२३ मध्ये दास यांना ‘ए-प्लस’ मानांकन देण्यात आले आहे.

तीन मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरना या यादीत ‘ए प्लस’ मानांकन देण्यात आले असून, या यादीत शक्तिकांत दास पहिल्या स्थानावर आहेत. दास यांच्या पाठोपाठ स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर थॉमस जे. जॉर्डन आणि व्हिएतनामच्या बँकेचे गव्हर्नर गुयेन थी हाँग यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. महागाई नियंत्रण, अर्थव्यवस्थेच्या वाढीचे लक्ष्य, चलन स्थिरता व व्याजदर व्यवस्थापनात यश असे निकष असल्याचे ग्लोबल फायनान्सने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्तिकांत दास यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ‘‘हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामुळे जागतिक स्तरावर आपले आर्थिक नेतृत्व प्रतिबिंबित झाले आहे. शक्तीकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गाला बळकट करत राहील,’’ असे मोदी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.