UDGAM Portal : बँकांमधल्या बेवारस रकमेची अन् खात्यांची माहिती काढता येणार; RBI ने लाँच केलं पोर्टल

Reserve Bank of India
Reserve Bank of IndiaSakal
Updated on

UDGAM Portal : बँकांमध्ये अनेकांचे पैसे पडून राहतात, पुढे ते तसेच खात्यावर राहतात. अनेकांच्या मृत्यूनंतर बँकांमध्ये राशी जमा असते, त्याचंही पुढे काही होत नाही. त्यामुळे आता आरबीआयने एक पोर्टल सुरु केलं आहे. त्याद्वारे बेवारस खात्यावरील रकमेची माहिती मिळवता येणार आहे.

आरबीआयच्या वतीने एक रीलीज जारी करण्यात आलेलं आहे. बँका आपल्या वेबसाईटवर वेबारस रकमेची आणि खात्यांची माहिती देत असतात. खातेधारक आणि लाभार्थी यांना सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध होणार असून डेटाची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. आरबीआयने त्यासाठीच आता एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाँच केलं आहे.

Reserve Bank of India
गोव्यातील नाईट क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन; आयपीएस अधिकारी निलंबीत

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी बेवारस रकमेच्या शोधासाठी यूडीजीएएम नावाचं एक वेब पोर्टल लाँच केलं आहे. आरबीआयने या पोर्टलच्या ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी अनेक बँकांमधील रकमेची माहिती दिली आहे. यूडीजीएएम पोर्टलच्या मदतीने ग्राहक सोप्या पद्धतीन ठेवी आणि खाती सहजपणे शोधू शकतील.

Reserve Bank of India
Nashik Crime: दिंडोरी रोडवरील तलाठी परीक्षा केंद्राबाहेर एक संशयित ताब्यात; साहित्य हस्तगत

या पोर्टलद्वारे ग्राहक त्यांच्या बँकांमधील वैयक्तिक सेव्हिंग खाती सक्रिय करू शकतात किंवा न वापरलेली ठेव रक्कम गोळा करू शकतात. आरबीआयने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, हे पोर्टल सहभागी संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (REBIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (IFTAS) यांच्या भागीदारीत तयार केले आहे. सध्या, पोर्टलवर सूचीबद्ध केलेल्या सात बँकांमध्ये ग्राहकांना त्यांच्या ठेवींची माहिती पाहता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()