Jaswant Singh : शौर्यगाथा!... जेव्हा भारतीय जवानाने 72 तासात चीनच्या 300 जवानांना ढगात धाडले

या युद्धात एकाच भारतीय सैनिकांने 300 चीनी सैनिकांना यमसदनी पाठवले होते
Real Hero Jaswant Singh
Real Hero Jaswant Singhesakal
Updated on

1962 च्या भारत-चीन युद्धाच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. या युद्धात भारतीय जवानांनी ज्या प्रकारे शौर्य दाखवले त्याचा भारताला नेहमीच अभिमान आहे. या युद्धादरम्यान चीनने अरुणाचल प्रदेश बळकावण्याच्या इराद्याने तिथल्या सीमेवर हल्ला केला. पण त्यांना चीनी सैनिकांना माहिती नव्हते की तिथे त्यांचा मृत्यू वाट पाहत उभा असेल.

या युद्धात एकाच भारतीय सैनिकांने 300 चीनी सैनिकांना यमसदनी पाठवले होते. त्यांचे नाव होते रायफलमन जसवंतसिंग रावत. हा किस्सा आहे 1962 च्या भारत-चीन युद्धाचा. पहाटे पाचच्या सुमारास चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेश ताब्यात घेण्याच्या इराद्याने सेला टॉपजवळ हल्ला केला.

Real Hero Jaswant Singh
दोन स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सांगणारा ''आरआरआर''

घटनास्थळी तैनात असलेल्या गडवाल रायफल्सच्या डेल्टा तुकडीने त्यांना थोपवून धरले. जसवंतसिंग रावत हे त्यापैकीच एक होते. चीनी सैन्य आपल्यावर वरचढ होतंय हे लक्षात येताच जसवंतसिंग यांनी युद्धभूमीवर उतरण्याचा निर्णय घेतला.

Real Hero Jaswant Singh
भारतीय लष्कर लडाखमध्ये घेणार AI वर चालणाऱ्या मानवरहित वाहनांची चाचणी

तो दिवस होता 17 नोव्हेंबर 1962 चा. हा लढा पुढील 72 तास अखंड चालू राहिला. जसवंतसिंग यांनी एकट्याने चिनी सैनिकांवर मात केली. आपल्या विशेष योजनेनुसार त्यांनी एकट्याने 300 हून अधिक चिनी सैनिकांना ठार केले. अरुणाचलच्या सीमेवर चिनी सैनिकांना रोखण्यातही ते यशस्वी झाले होते. युद्धाच्या मध्यावधी वेळेवर जसवंतसिंग यांना माघार घेण्याचा आदेश देण्यात आला होता.

Real Hero Jaswant Singh
धक्कादायक....येथील जवानाचे अरूणाचल प्रदेशात सेवा बजावताना निधन 

भारतीय सैन्याकडे उपलब्ध रसद आणि दारूगोळा संपला होता. अशा परिस्थितीत शत्रूसमोर उभे राहणे म्हणजे मृत्यूला मिठी मारण्यासारखे होते. पण, माघार घेतील ते जसवंतसिंग कसले. हा आदेश न मानता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूचा सामना केला.

Real Hero Jaswant Singh
Tawang Clash : चिनी सैनिक जिवाच्या आकांताने पळत होते; भारतीय जवानांनी पाठलाग करुन...

हे युद्ध जिंकण्यात जसवंतसिंग यांना मदत करण्यात दोघा बहिणींनीच्या शौर्याचाही उल्लेख करावा लागतो. त्या म्हणजे, उल्लेख 'सेला आणि नूरा' या दोन बहिणी. चिनी सैनिकांशी लढताना जेव्हा जसवंतसिंग यांचे सर्व सहकारी शहीद झाले. तेव्हा त्यांनी लढण्याचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नवी रणनीती आखली.

Real Hero Jaswant Singh
Video : काठ्यांनी बदडून काढले चिनी सैनिक? व्हीडिओने सोशल मीडियात धुमाकूळ

जसवंतजींनी भारतीय सैन्य हरले आहे. आमचे सगळे सैनिक आणि शस्त्रसाठा संपला असल्याचे चीनी सैन्याला भासवले. त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले नाही. तर याउलट शांत राहून सर्व शस्त्रे आणि दारूगोळा एकत्र केला.  यामध्ये सेला आणि नूरा नावाच्या स्थानिक मुलींनी त्यांना मदत केली. जसवंतजींच्या खाण्यापिण्याचीही काळजी त्यांनी घेतली.

जसवंतसिंग यांच्या बाजूने शांतता पाहून चिनी सैनिकांना भारतीय सैनिक संपल्याची खात्री पटली. जेव्हा चिनी सैन्य थोडे निवांत झाले तेव्हा जसवंतजींनी पून्हा फायरींग सुरू केले. कधी ते फायरींग करायचे तर कधी बाँब फेकायचे. यामूळे ते एकटेच नसून अख्खी फौजच फायरींग करतेय असे वाटायला लागले.

Real Hero Jaswant Singh
हाडे गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवान करत आहेत योगासने

त्यानंतर बराच वेळ जसवंत असेच लढत राहिले आणि चिनी सैनिकांवर मात करत राहिले. पुढे त्यांना चिनी सैनिकांनी लक्ष्य केले. पकडले जाऊ असे वाटत असतानाच जसवंचजींनी मृत्यूला कवटाळले. या युद्धात एकट्या जसवंतने सुमारे 300 चिनी सैनिकांना ठार केले.

विशेष म्हणजे जसवंतला शहीद होऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण अरुणाचलच्या लोकांचा असा विश्वास आहे की ते अजूनही जिवंत आहेत. सीमेवर तैनात होऊन अरूणाचलचे रक्षण करत आहेत. जसवंतसिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जसवंतगड उभारण्यात आला.

Real Hero Jaswant Singh
Jammu Kashmir : केंद्राचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करणार 1800 अतिरिक्त CRPF जवान

या गडावर एक घर आहे. ज्यात एक पलंग ठेवण्यात आला आहे, जो पोस्टवर तैनात लष्कराच्या जवान दररोज नीटनेटका करतात. यामध्ये जसवंतसिंग आजही राहतात अशी मान्यता आहे. जसवंतजींचे शूजही नियमितपणे पॉलिश केले जातात. भारतीय लष्करानेही ते मृत्यूपश्चात देशसेवा करतात असे मान्य केले आहे. त्यामूळे त्यांना प्रमोशनही देण्यात येते.

शहीद जसवंत सिंग रावत यांच्यावर 72 तास: शहीद हू नेव्हर डायड नावाचा चित्रपटही बनवण्यात आला. दिग्दर्शक म्हणून अविनाश ध्यानी यांनी चित्रपटात जसवंत सिंग यांच्या शौर्याचे वर्णन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.