नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाच्या बाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी वकील जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या उप-वर्गीकरणाबाबत केलेले स्पष्टीकरण SC/ST आरक्षणाला लागू होत नाही, असा दावा त्यांनी याचिकेमध्ये केला आहे.
'राज्य किंवा केंद्र सरकारला अनुसूचित जातींचे वर्गीकरण किंवा उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार नसून संविधानाच्या कलम 341 आणि 342 नुसार फक्त राष्ट्रपती आणि संसदेला हा अधिकार आहे, असं मत जयश्री पाटील यांची याचिकेत व्यक्त केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार का हे पाहणं महत्वाचं आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयाला देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे.