Farmers Protest Delhi : तात्पुरत्या तुरुंगासाठी मैदान देण्यास नकार ; दिल्लीच्या ‘आप’ सरकारची भूमिका,काँग्रेससह विरोधी पक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीत दाखल होणारे शेतकरी योग्य कारणांसाठी आंदोलन करीत असल्याचे सांगत दिल्लीतील ‘आप’ सरकारने बवाना येथील मैदान तात्पुरत्या तुरुंगासाठी पोलिसांना देण्यास नकार दिला.
Farmers Protest Delhi
Farmers Protest Delhi sakal
Updated on

नवी दिल्ली : विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीत दाखल होणारे शेतकरी योग्य कारणांसाठी आंदोलन करीत असल्याचे सांगत दिल्लीतील ‘आप’ सरकारने बवाना येथील मैदान तात्पुरत्या तुरुंगासाठी पोलिसांना देण्यास नकार दिला. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर दाखल होत असताना सुरक्षा दलाकडून त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संभाव्य कारवाई दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्याबाबत बवाना येथील मैदानाची मागणी केली होती. मात्र त्यास आप सरकारने नकार दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना अटक करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे गृहमंत्री कैलास गहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मेट्रो मार्गाने शेतकरी दिल्लीत शिरू नयेत, यासाठी प्रशासनाने दिल्ली मेट्रोच्या नऊ स्थानकातील प्रवेशावर निर्बंध आणले होते. संवेदनशील ठिकाणांकडे जाणारी फाटके बंद करण्यात आल्याने या स्थानकात गर्दीचा महापूर उसळला होता. मध्य दिल्लीतील राजीव चौक, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, पटेल चौक, जनपथ, बाराखंबा रोड आणि खान मार्केट या स्थानकातील फाटके बंद करण्यात आली होती. एरवी मेट्रो पकडण्यासाठी वा बाहेर पडण्यासाठी पाचेक मिनिटे लागतात. पण असंख्य फाटके बंद करण्यात आल्याने नागरिकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ विलंब सहन करावा लागला. सुरक्षा यंत्रणांची देखील यामुळे तारांबळ उडाली.

Farmers Protest Delhi
Farmer Protest Today: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते का बंद केले? बॅरिकेड्सवरून पंजाब, हरियाणा हायकोर्ट संतापले

आंदोलनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय असून सरकारने त्या मान्य कराव्यात, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. एमएसपीला कायद्याची हमी देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी याच पक्षाचे नेते श्रीनिवास बी. व्ही. यांनी केली तर माकप नेत्या वृंदा करात यांनी हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा दुसरा टप्पा असल्याचे सांगितले. शेतकरी आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील नोएडा सीमेवर तर हरियानातील गुरुग्राम सीमेवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

फरिदाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हीच स्थिती होती. सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांसह शाळकरी मुलांना यामुळे अतोनात त्रास सहन करावा लागला. जगजीतसिंह धल्लेवाल आणि सरवानसिंह पंधेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनात दोनशे शेतकरी संघटना सामील झाल्या होत्या. चंडीगडमध्ये केंद्रीय मंत्र्यांची शेतकरी नेत्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आल्याचे पंधेर यांनी सांगितले. चंडीगडला चर्चेसाठी गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळात कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह पियुष गोयल आणि नित्यानंद राय यांचा समावेश होता. तोडगा काढण्यासाठी आणखी वेळ गरजेचा आहे, अशी प्रतिक्रिया मुंडा यांनी दिली.

२०२१ रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी केंद्र सरकारने जी आश्‍वासने दिली होती, त्या आश्वासनांची पूर्तता अजूनही केली जात नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. गेल्या आंदोलनावेळी लाल किल्ला परिसरात हाहाकार उडाला होता. तो अनुभव लक्षात घेऊन यावेळी लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. लाल किल्ल्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. विमानतळाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

चलो दिल्ली...

  • सीकरी, पलवल, फरिदाबाद-दिल्ली सीमा, झाडसेंतली, खोरी व मांगर नाक्यावर पोलिस तैनात. वाहनांची तपासणी

  • दिल्ली-गुरुग्राम महामार्गावर दहा किलोमीटर वाहनांची रांग. एक्स्प्रेस वेचे सेवा रस्ते बॅरिकेड्सने अडविले. ड्रोनद्वारे हालचालींवर देखरेख.

  • दिल्लीत कलम १४४ लागू. ट्रॅक्टर, बस आणि अन्य वाहनांना दिल्लीत प्रवेश करण्यास मनाई. सीमेवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा. १२ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत जमावबंदी.

  • गाझियाबाद येथे चार शेतकरी नेते नजरकैदेत.

  • शेतकरी आंदोलनामुळे चौदा शेतकरी नेते नजरकैदेत. जियाबाद पोलिसांकडून कारवाई

  • शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिस समोरसमोर. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

  • शेतकरी आंदोलनामुळे डीएनडी उड्डाणपुलावर वाहनांची तपासणी. त्यामुळे वाहतूक कोंडी

  • दिल्लीकडे जाणाऱ्या भाकियूच्या पदाधिकाऱ्यांना दुहाई येथे ईस्टर्न पेरिफेरल येथे अडविले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे एक्स्प्रेस वेवरील टोलजवळ धरणे आंदोलन. पोलिसांविरोधात घोषणाबाजी. भोजपूर येथे दिल्ली-मेरठ रस्त्यांवर पोलिस तैनात

  • दिल्ली सीमेवर ठिकठिकाणी तपासणी. दिल्लीबाहेरच्या रुग्णांना त्रास. दिल्ली परिसरातील रुग्णांना जीटीबी किंवा राजीव गांधी रुग्णालयात जाण्यासाठी वीस मिनिटे लागत असताना आज एक तास लागत होता.

  • हरियाना-पंजाब शंभू सीमेवर शेतकरी व पोलिस समोरासमोर. पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.

  • काही काळासाठी बंद केलेली टिकरी सीमा वाहतुकीसाठी पुन्हा खुली. दोन्ही मार्गाने ये-जा सुरू

  • भारतीय किसान युनियनचे आंदोलन पाहता मोदीनगर, मुरादनगर, निवाडी आणि भोजपूर पोलिस दक्ष. अनेक कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची धडक. त्यांना नजरकैदेत ठेवले. काही कार्यकर्ते छुप्या मार्गाने दिल्लीत. पोलिसांनी त्यांना मुरादनगर येथे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर अडविले.

  • चलो दिल्लीवरून रेल्वे प्रशासन सजग. पंजाब, हरियाना,

  • उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे मार्गावर देखरेख वाढविली. तीन राज्यांतील अधिकारी संपर्कात. दुपारपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत

  • शेतकरी दिल्लीच्या सीमेत येऊ शकले नाही तर बुधवारी शहरातील वाहतूक सुरू होईल, असे दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांची माहिती.

  • दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी शेतकरी आंदोलनामुळे टिकरी सीमेला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.