कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या; राहुल गांधींची मागणी

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या; राहुल गांधींची मागणी
Updated on

नवी दिल्ली: कोरोना महासाथीचं अचानकपणे उद्भवलेल्या संकट भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठीचं मोठं आव्हान होतं. आरोग्य व्यवस्था फारशी चांगली नसलेल्या भारतात देखील याचे परिणाम पहायला मिळाले. कोरोना दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षाही जास्त लोक मृत्यूमुखी पडलेले दिसून आले. या अत्यंत गंभीर परिस्थितीत अनेक जणांनी आपले आप्तस्वकिय गमावले. ही जीवितहानी भरुन निघणारी नसली तरी लोकांचं दु:ख कमी केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी सरकारने मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करावी, अशी मागणी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. सोबतच त्यांनी मृतांची योग्य आकडेवारी जाहीर करण्याची देखील मागणी केली आहे.

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या; राहुल गांधींची मागणी
कोविड रिलीफ फंडातील 799 कोटींपैकी फक्त 24 टक्के निधीचा वापर - RTI

यासंदर्भातच आज काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन मागण्या केंद्र सरकारकडे केल्या आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच त्यावरील कॅप्शनमध्ये या मागण्या केल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेस पक्षाच्या दोन मागण्या आहेत. एक म्हणजे कोरोना मृतांचे योग्य आकडे सांगावे. दुसरी मागणी म्हणजे कोरोना महासाथीमध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. सरकार असाल तर जनतेचं दु:ख तुम्हाला कमी करावं लागेल. त्यामुळे नुकसान भरपाई तर द्यावीच लागेल. असं त्यांनी म्हटलंय. सोबतच त्यांनी #4LakhDenaHoga असा हॅश्टॅग देखील जोडला आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'गुजरात मॉडेल'चं कथित वास्तव मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, गुजरात मॉडेलची खूप चर्चा झाली मात्र, कोरोना काळात आम्हाला आढळून आलं की, लोकांना हॉस्पिटल मिळाले नाहीत, बेड्स मिळाले नाहीत. याबाबतची काही उदाहरणे देखील या व्हिडीओमध्ये आपला अनुभव सांगताना दिसतात. साडेचार मिनिटांच्या या व्हिडीओमधून राहुल गांधींनी आरोग्य व्यवस्थेची अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरात सरकार असा दावा करतंय की कोरोना काळात दहा हजार लोक मरण पावले. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या सर्व्हेमध्ये सुमारे तीन लाख लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावाही राहुल गांधींनी या व्हिडीओमध्ये केला आहे. या तीन लाख लोकांना चार लाख रुपयांची भरपाई मिळायला हवीच, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या; राहुल गांधींची मागणी
काँग्रेस घाबरली? कार्यालयात लावला इंदिरा गांधींसोबत सरदार पटेलांचा PHOTO

स्वत:साठी वेगळं विमान खरेदी करायला पंतप्रधानांकडे आठ हजार पाचशे कोटी रुपये आहेत मात्र, कोरोना मृतांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पैसे का नाहीयेत? टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी अनेक उद्योगपतींनी मोठी रक्कम मदत म्हणून दिलेली असतानाही लोकांना भरपाई दिली जात नसल्याचंही राहुल गांधींनी म्हटलंय. 'कोविड न्याय कॅम्पेन' असं या मोहिमेला नाव असणार आहे, ज्याअंतर्गत फक्त गुजरातच नव्हे तर भारतातील लाखो कुटुंबियांना ही भरपाई मिळावी, यासाठी काँग्रेस हा मुद्दा लावून धरेल आणि सरकारवर दबाव टाकेल, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()