Kalicharan Maharaj Arrest News : वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या कालीचरणला रायपुर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांना रायपुरला घेऊन जाणार आहेत.(Kalicharan Maharaj Arrest News) त्यानंतर आता कालीचरणच्या समर्थकांकडून त्यांना सोडवण्याची मागणी होतेय.
कालीचरणला सोडा अशी मागणी करणारा हॅश टॅग (#ReleaseKalicharanMaharaj) सध्या ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये (Twitter Top Trends) आहे. तर देशातील अनेक राज्यांतील महात्मा गांधी यांना मानणाऱ्या नेत्यांनी कालीचरणवर कारचाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील कालीचरणाच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.
कालीचरण यांने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला (Nathuram Godse) नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. देशातील वेगवेळ्या राज्यांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.