Reliance AGM 2023: AI मॉडेल ते जिओ एअर फायबर... मुकेश अंबानींच्या १० मोठ्या घोषणा! भारताला 'असा' होणार फायदा

Reliance AGM 2023
Reliance AGM 2023
Updated on

Reliance AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (सोमवार) झाली. यावेळी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी संबोधित करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. या सभेतील १० मोठ्या घोषणा आपण जाणून घेऊया.

१-ईशा-आकाश आणि अनंत अंबानी बोर्डात सामील

संचालक मंडळाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. ही नियुक्ती शेअरहोल्डर यांच्या मान्यतेने मंजूर होईल. याशिवाय नीता अंबानी या बोर्डावर नसतील.

२-मुकेश अंबानी पाच वर्ष राहणार चेअरमन

मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले की ते ५ वर्ष रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी असतील. त्यांनी सांगितले की त्यांच्या तीन जबाबदाऱ्या आहेत. यामध्ये पुढच्या पिढीच्या लिडरला तयार करणे आणि सक्षम करणे, आकाश-ईशा आणि अनंत यांना मार्गदर्शन करणे आणि रिलायन्सची अद्वितीय संस्थात्मक संस्कृती समृद्ध करणे, या गोष्टींचा समावेश आहे.

३ -२०४७ ला भारत बनेल विकसित देश-

मुकेश अंबानी यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या संदेशाने आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, भारत खचून जात नाही, थांबत नाही आणि हार मानत नाही. मुकेश अंबानी यांच्या मते, देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहे. सन २०४७ पर्यंत भारत एक पूर्ण विकसित देश होईल अशी अपेक्षा आहे.

४-डिसेंबरपर्यंत Jio 5G रोलआउट-

रिलायन्स AGM २०२३ मध्ये केलेल्या मोठ्या घोषणांपैकी एक Jio 5G बद्दल होती. डिसेंबर २०२३ पर्यंत ही सेवा देशभरात सुरू केली जाईल.

५-गणेश चतुर्थीला 'जिओ एअर फायबर' लाँच होणार

जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ ला लॉन्च केले जाईल. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जिओ एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Reliance AGM 2023
Bhavana Gawali: "राज अन् उद्धव यांचं कधीच मिटलं असतं, पण..."; खासदार भावना गवळी काय म्हणाल्या?

६-जिओ फिनची एंट्री विमा क्षेत्रात होणार

जिओ फिन विमा क्षेत्रात प्रवेश करेल, यासाठी जागतिक नेत्यांसोबत भागीदारी केली जाईल. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून १४२ कोटी भारतीयांना आर्थिक सेवा पुरविल्या जातील. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ब्लॉकचेन आणि CBDT आधारित उत्पादने लाँच करेल, ज्यामध्ये जीवन आणि आरोग्य विमा समाविष्ट असेल.

७-भारत बनेल ऊर्जा निर्यातक

गुजरातमधील जामनगर येथील धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सवर काम वेगाने सुरू आहे. सौर पीव्ही उत्पादन परिसंस्था तयार करणे हे आमचे प्राधान्य आहे. यासोबतच २०२६ पर्यंत बॅटरी गिगा कारखाना उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

८- २०३५ पर्यंत नेट कार्बन झिरोचे लक्ष्य

२०३५ पर्यंत आम्ही नेट कार्बन झिरोचे लक्ष्य आहे. त्यासाठी हरित ऊर्जा वेगाने विकसित केली जात आहे. कार्बन फायबरमध्ये जगातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे. आपण जीवाश्म इंधनाकडून हरित ऊर्जेकडे वाटचाल करत आहोत.

९- एआय मॉडेलचा भारताला फायदा

जिओ प्लॅटफॉर्मला भारत-विशिष्ट एआय मॉडेल विकसित करायचे आहेत. ज्याचा भारताला फायदा होईल. देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत AI पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

१०- जिओ भारत छोट्या व्यावसायिकांना पाठिंबा देईल

जिओ भारत छोट्या व्यावसायिकांना पाठिंबा देईल. त्याचे UPI इंटिग्रेशन सरकारी समर्थन मिळवण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. यामुळे सध्याच्या किमतीपेक्षा ३० टक्के स्वस्त असेल.

Reliance AGM 2023
खूशखबर! आरोग्य विभागात जम्बो भरती, उद्या निघणार जाहिरात; आरोग्यमंत्र्यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.