नवी दिल्ली - हवा प्रदूषणाचा सामना करणाऱ्या भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. हवा प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या पीएम २.५ कणांचे प्रमाण २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १९.३ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे आयुर्मान एक वर्षाने वाढल्याचा दावा एका नव्या अहवालात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पीएम २.५ कणांतील जगभरातील ही दुसऱ्या क्रमांकाची घट आहे. बांगलादेशात या कणांत सर्वाधिक घट झाली आहे.