Pooja Khedkar case: पूजा खेडकरला दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचा कोर्टाचा आदेश

Pooja Khedkar case Court order: ४ ऑक्टोबर पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम आहे. पूजा खेडकरला तोपर्यंत अटक करता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.
Pooja Khedkar
Pooja KhedkarEsakal
Updated on

नवी दिल्ली- ४ ऑक्टोबर पर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम आहे. पूजा खेडकरला तोपर्यंत अटक करता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. पूजा खेडकरच्या वकिलांनी १५ दिवसांची वेळ कोर्टात मागितली होती. मात्र UPSC ची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विरोध केल्याने कोर्टाने तो वेळ कमी करत आठवड्याचा वेळ दिला आहे. पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.

पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. मागच्या सुनावणीवेळी पूजाने कोर्टाला सांगितलं होत, की ती AIMS रुग्णालयात तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार आहे. दिल्ली पोलिसांनी सुनावणीच्या आधी एक दिवस दिल्ली हायकोर्टात नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल केला होता आणि त्यात पूजाने UPSC ला सादर केलेल्या दोन अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा दावा केला होता.

Pooja Khedkar
Pooja Khedkar: 'उमेदवारी रद्द झाल्याचा आदेश मिळालाच नाही', पूजा खेडकरची हायकोर्टात धक्कादायक माहिती

पोलिसांनी कोर्टाकडे १० दिवसांचा वेळ मागितल्याने कोर्टाने सुनावणी तहकूब केली होती. तर, १९ सप्टेंबर रोजी UPSC ने कोर्टात पूजा खेडकरने बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा आरोप केला होता. अटकपूर्व जामिनासाठी दाखल झालेल्या याचिकेवर आपलं म्हणणं मांडताना पूजाने खोटी साक्ष दिल्याचा UPSC चा आरोप होता. तर, दबाव टाकण्यासाठी UPSC ने जाणीवपूर्वक ही रणनीती आखल्याचा पूजा खेडकरच्या वकिलांनी दावा केला होता.

याबाबत कोर्टाने नोटीस जारी करून पूजाकडून उत्तर मागवलं होतं. पूजा खेडकरला अटकपूर्व जामिनासाठी दिलासा मिळत आहे हे गंभीर आहे, असा UPSC च्या वकिलांनी दावा केला होता. दुसरीकडे, पुणे कलेक्टर विरोधात हराशमेंटची तक्रार दाखल केल्याने पूजावर हे आरोप केले गेले, असं पूजा खेडकरचे वकील म्हणाले.

Pooja Khedkar
Pooja Khedkar Case: "तोपर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही," हायकोर्टाचे UPSCचा युक्तीवाद का नाकारला?

माझी क्लाइंट (पूजा खेडकर) सध्या महाराष्ट्रमधे आहे. सगळी कागदपत्रं आम्ही सादर केली आहेत, ती सगळी बरोबर आहेत, असं पूजा खेडकरचे वकील कोर्टात म्हणाले. मीडियाचं या प्रकरणाकडे एवढं लक्ष असल्याने पूजा तणावात आहे. आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, असंही वकील म्हणाले. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.