निवडणूक आयोगानं पंजाबमधील जालंधर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केलीये. याशिवाय उत्तर प्रदेशातील दोन, ओडिशा आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलीये.
Rahul Gandhi Wayanad Seat Election : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळालाय. वायनाड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होणार नाहीये.
आज, कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election) तारीख जाहीर करताना निवडणूक आयोगानं (Election Commission) चार विधानसभा जागांसाठी आणि एका लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. परंतु, वायनाड जागेसाठी निवडणूक जाहीर केली नाही.
मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यासाठी आमच्याकडं 6 महिन्यांचा कालावधी आहे. आताच आम्ही घाई करणार नाही. त्यांच्याकडं अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे.'
राहुल गांधींनी कर्नाटकात भाषणादरम्यान 'मोदी आडनाव'वर भाष्य केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये गुजरातमधील सुरत येथील भाजप आमदारानं त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. शुक्रवार, 24 मार्च रोजी सुरत कोर्टानं राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात राहुल गांधींना तात्काळ जामीन मिळाला आणि न्यायालयानं या निकालाला आव्हान देण्यासाठी त्यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीवर तीस दिवसांची बंदी घातली. मात्र, त्यांना लोकसभा सदस्यत्व गमवावं लागलं. याप्रकरणी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत आहे.
निवडणूक आयोगानं पंजाबमधील जालंधर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केलीये. याशिवाय उत्तर प्रदेशातील दोन, ओडिशा आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलीये. 10 मे रोजीच सर्व जागांवर मतदान होणार आहे. या सर्व जागांचे निकाल 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसोबत लागणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.