अहमदाबाद - जगभरात भूकंपाशी सामना करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, आपल्या पूर्वजांनाही भूकंपाशी सामना करण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. गुजरातमधील भूकंपप्रवण वडनगरमध्ये इ.स दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील प्राचीन भूकंपरोधक बांधकामाचे अवशेष उत्खनादरम्यान आढळले. त्यामुळे, त्या काळातही लोकांना भूकंपरोधक तंत्रज्ञान अवगत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
गुजरातेतील मेहसाना जिल्ह्यातील वडनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव असलेल्या वडनगरमध्ये भारतीय पुरातत्त्व खात्याच्या मदतीने उत्खनन करण्यात येत आहे. हा प्रदेश भूकंपप्रवण असूनही या अवशेषांना इतक्या वर्षांनंतरही कसलाही तडा गेलेला नाही. मात्र, यासंदर्भात आणखी संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समुद्री संग्रहालयाचे महासंचालक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा.वसंत शिंदे म्हणाले, की हे वजनदार वीटांचे भक्कम भिंतींचे अवशेष आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुजरातमधील हा प्रदेश भूकंपप्रवण आहे. त्यामुळे, भूकंपाचा धक्का सहन करण्यासाठी भिंतीत लाकडासारखी वस्तू ठेवून काही अंतर ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. उत्खननादरम्यान आढळलेल्या अवशेषांपैकी बहुतेक घरे आहेत. ही घरे व इतर अवशेषही दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील असून आधुनिक काळातही ते टिकून आहेत. आधुनिक काळातील या घरांप्रमाणे मातीच्या लहान ढिगाऱ्यावर किंवा टेकडीवरील घरे समान रचना दर्शवितात. भिन्न सास्कृंतिक काळातील या अवशेषांमध्ये निवासी इमारतींबरोबरच धार्मिक स्थळे व गोदामांचाही समावेश आहे. त्यातून या संपूर्ण वस्तीची समृद्धी दिसते, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक निजामुद्दिन ताहेर यांनीही डिसेंबरमध्ये या परिसराला भेट दिली. त्यांनी या अवशेषांवर अधिक संशोधनाची गरज व्यक्त केली.
हडप्पाशी साधर्म्य
गुजरातेत आढळलेल्या या अवशेषांचे हडप्पाकालिन अवशेषांशी साम्य आहे. येथील भिंती हडप्पाप्रमाणेच जाड वीटांपासून बनविलेल्या आहेत. हडप्पातील प्राचीन अवशेषही अशा प्रकारचे आहेत. हडप्पामधूनही बांधकामाचे हे तंत्रज्ञान इतरत्र गेल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.
येथील वीटांच्या भिंतींच्या अवशेषांत अंतर आढळले. भिंतीमध्ये टाकलेल्या लाकडाचे विश्लेषण केल्यानंतर ही संरचना भूकंपात टिकून राहण्याच्या दृष्टीने बनविली का, हे नेमकेपणाने माहित होईल.
- निजामुद्दिन ताहेर, माजी संचालक, भारतीय पुरातत्त्व विभाग.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.