नवी दिल्ली : नूपुर शर्मा (Nupur Sharma) प्रकरणात भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने कान धरून माफी मागायला हवी. भाजप माफी मागणार नाही का? या वादाचा पाया त्यांनीच रचला आहे. भाजपने देशातील अल्पसंख्याकांची माफी मागावी. त्यांनी कान धरावे. भाजपने महिलेला बळीचा बकरा बनवले आहे. समोर येऊन माफी मागणारा एकही मर्द भाजपमध्ये नाही का? या लोकांनी पाण्यात बुडून मरावे, असे काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी (Renuka Chaudhary) म्हणाल्या.
नूपुर शर्मा जे बोलल्या ते चुकीचे आहे. कधीतरी पुढे जाऊन सत्य स्वीकारायला शिका. मला वाटले की भाजपमध्ये (BJP) मर्द आहेत; परंतु, कोणीही नाही, असेही रेणुका चौधरी (Renuka Chaudhary) म्हणाल्या. रेणुका यांच्याआधी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनीही भाजपवर निशाणा साधला. ‘आता तरी नूपुर शर्मा यांनी देशाची माफी मागावी’ असे तिवारी म्हणाले.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर आता भाजपच्या (BJP) सर्वोच्च नेतृत्वाने माफी मागावी. देश पेटविण्याचे काम त्यांनी आपल्या प्रवक्त्याच्या माध्यमातून केले होते.
प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. कोर्टाने त्यांना टीव्हीवर देशाची माफी मागण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर तुमच्या वक्तव्यामुळे तुम्हाला धोका नसून देशाला धोका निर्माण झाला आहे, अशी कडक टीका न्यायालयाने केली आहे.
इतकेच नाही तर आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे व उदयपूरमध्ये घडलेल्या घटनेमागे तुमचे वक्तव्य आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या टीकेनंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.