Bengaluru Crime : रेणुकास्वामी खूनप्रकरणी दर्शन, पवित्राची मोटार जप्त; मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी दिले ३० लाख

अभिनेत्री पवित्रा गौडा आणि अभिनेता दर्शन यांच्यासह अन्य १३ जणांना अटक करून त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे.
darshan and pavithra gowda
darshan and pavithra gowdasakal
Updated on

बंगळूर - रेणुकास्वामी याच्यावर निर्घृण हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी कर्नाटकमधील बंगळूरच्या पश्चिम विभाग पोलिसांनी अभिनेत्री पवित्रा गौडा आणि अभिनेता दर्शन यांच्यासह अन्य १३ जणांना अटक करून त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दर्शन आणि पवित्राची मोटार ताब्यात घेतली असून त्यात सापडलेली मद्याची बाटलीही जप्त केली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दर्शनने एका टोळीला ३० लाख रुपये दिल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत १७ आरोपींना अटक केली असून या सर्वांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी दर्शनचा निकटवर्तीय विनय आणि दर्शनचा दुसरा मित्र प्रदोषच्या नावावर असलेल्या मोटारी जप्त केल्या आहेत. आरोपींनी रेणुकास्वामी याचा मृतदेह प्रदोषच्या मोटारीतून नेला आणि सुमनहळ्ळी नाल्यात फेकून दिला, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.