Weather Update: पुन्हा एकदा 7 राज्यांना पावसाचा इशारा, उत्तर भारत थंडीने गारठला; राज्यात काय स्थिती? जाणून घ्या

कडाक्याच्या थंडीने उत्तर भारत गारठला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज शनिवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये 7-10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदवले आहे
parbhani winter weather update temperature of 8 degree c marathi news
parbhani winter weather update temperature of 8 degree c marathi newssakal
Updated on

कडाक्याच्या थंडीने उत्तर भारत गारठला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज शनिवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये 7-10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदवले आहे. दाट धुक्यामुळे आज(शनिवारी) सलग चौथ्या दिवशी रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून दिल्लीकडे येणाऱ्या सुमारे ३० गाड्या उशिराने धावल्या.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज, जयपूर आणि राष्ट्रीय राजधानीसह उत्तरेकडील शहरे शनिवारी सकाळी थंडीची लाट आणि दाट धुक्याची चादर पसरली होती. धुक्यात झालेल्या रस्ते अपघातात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.

हवामान विभागामे दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि बिहारमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये शनिवार आणि रविवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

parbhani winter weather update temperature of 8 degree c marathi news
Ayodhya News : घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करा; पंतप्रधान मोदींचे अयोध्येतून आवाहन

80 विमान उड्डाणांवर परिणाम

धुक्यामुळे राजधानीत ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागला. कारण कमी दृश्यमानतेमुळे अनेक उड्डाणे आणि गाड्या उशीरा आणि वळवल्या गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत दिल्लीच्या IGI विमानतळावर हवामानामुळे सुमारे 80 उड्डाणे उशीर झाल्याची माहिती मिळाली.

parbhani winter weather update temperature of 8 degree c marathi news
India Alliance : ''इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा दहा दिवसांमध्ये सुटणार'', काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात किमान तापमानात वाढ होत असली, तरी राज्यात गारठा कायम आहे. पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानात कमी- जास्त होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वर्षाच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.