Republic Day 2023 : राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड विशिष्ट समाजातूनच का निवडले जातात? जाणून घ्या खास इतिहास

राष्ट्रपतींचे बॉडी गार्ड्स हे नेहमीच लोकांचे लक्ष आकर्षित करतात
Republic Day 2023
Republic Day 2023esakal
Updated on

Republic Day 2023 : राष्ट्रपती भवनावर एखादा खास कार्यक्रम असो किंवा स्वातंत्र्य दिनाची परेट राष्टपतींसोबत असलेल्या त्यांच्या बॉडीगार्डकडेही जनतेची पारखी नजर असते.राष्ट्रपतींचे बॉडी गार्ड्स हे नेहमीच लोकांचे लक्ष आकर्षित करतात. कारण त्यांचा पोषाख आणि त्यांची रुंद छाती असेच त्यांचे वर्णन कायम जनतेच्या नजरेत असते.परंतु तुम्हाला माहिती आहे का,हे गार्ड्स एका खास वर्गातील लोकांमधूनच निवडले जातात. यांचा इतिहास सुद्धा अगदी खास आहे. याचा रंजक इतिहास आज आपण जाणून घेऊया.

राष्ट्रपतीच्या बॉडीगार्डला PBG असे म्हटले जाते

हे लोक फार महत्वाची कामगिरी भारताच्या राष्ट्रपतींसाठी करतात. कारण राष्ट्रपतींची सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर असते. ते भारतीय सेनेतील घोडेस्वारी फौज रेजिमेंट मधील असतात.हे सर्वाधिक जुने घोडेस्वार युनिट आणि एकूण मिळून सर्वाधिक सीनियर युनिट आहे.हे युनिट राष्ट्पतींच्या अधिकृत कार्यक्रमांवेळी सुद्धा त्यांच्यासोबत असते.यांची निवड त्यांना दिलेल्या टास्कमध्ये ते कशा पद्धतीने पूर्ण करतात त्यानुसारच केली जाते.घोडेस्वारीमध्ये त्यांना मात देणे कठीणच.तसेच ते एक सक्षम टँक मॅन आणि पॅराट्रूपर्स देखील असतात.

काय आहे इतिहास?

राष्ट्रपतींच्या बॉडीगार्डचा इतिहास हा बरीच वर्षे जुना आहे. त्यांचे गठन १७७३ मध्ये इंग्रज गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगन यांनी आपल्या सुरक्षेसाठी ५० घोडेस्वार सैनिकांची मिळून एक तुकडी तयार केली होती.त्यांना मुगल हॉर्स असे म्हटले जायचे.मुगल हॉर्सची स्थापना १७६० मध्ये सरदार मिर्जा शाहबाज खान आणि सरदार खान तार बेन यांनी केली होती.त्यावेळी बनारसचा राजा चैत सिंह यांनी या युनिटसाठी ५० घोडेस्वार दिले होते.

या युनिटमध्ये घोडेस्वारांची एकूण संख्या १०० होती.या युनिटचे पहिले कमांडर ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टच स्वीनी टून होते.१७८४ ते १८५९ मध्ये त्यांच्या नावात बदल करुन ४४ वी डिव्हिजन रिकॉनेसां स्क्वाड्रनर केले होते. त्यानंतर दोन वर्षानंतर १९४६ मध्ये पुन्हा ते गव्हर्नर जनरल बॉडीगार्ड नावाने ओळखले जाऊ लागले. १९४७ नंतर जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा या तुकडीला दोन भागात विभागले गेले.यामध्ये एक भारतात राहिली तर दुसरी पाकिस्तानात. १९५० मध्ये त्यांना जे सध्या नाव मिळाले ते म्हणजेच प्रेसिटेंड बॉडीगार्ड्स.

Republic Day 2023
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण का होत नाही? संविधानात दडलं आहे कारण

राष्ट्रपतीच्या बॉडीगार्डसाठी विशिष्ट समाजाच्या व्यक्तींचीच निवड केली जाते

राष्ट्रपतींच्या या युनिटमध्ये फक्त राजपूत, जाट आणि शिखांचीच निवड होते.सुरुवातीला १७७३ मध्ये जेव्हा या युनिटचे गठन करण्यात आले होते.त्यावेळी मुस्लिमांना सुद्धा भरती करण्यात आले होते.नंतर मुस्लिमांसह हिंदू, ब्राम्हण यांना सुद्धा भरती केले जाऊ लागले. (Republic Day)

पण १८९५ नंतर यामध्ये ब्राम्हणांची भरती बंद केली. या युनिटमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांची उंची कमीत कमी ६.३ फूट असणे गरजेचे होते.जी आता ६ फूट ठेवण्यात आली आहे.त्यांचे डेप्युटी होते साहबजादा याकूब खान. पीबीजीच्या जवानांची खासियत म्हणजे त्यांचे मजबूत घोडे.यामध्ये जर्मनीतील खास ब्रीडच्या घोड्यांचा समावेश असतो.उंच मान असलेल्या या घोड्यांचे वजन जवळजवळ ४५० ते ५०० किलो असते. भारतीय सेनेत फक्त त्याच घोड्यांचे केस लांब ठेवले जाऊ शकतात. (President)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()