Republic Day Parade 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अवतरले अयोध्येतील प्रभू श्रीराम, उत्तरप्रदेशच्या चित्ररथाची खास वैशिष्ट्ये

देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर तिन्ही सैन्यदलांच्या पथसंचलनानंतर देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन देखील करण्यात येते.
Republic Day Parade 2024
Republic Day Parade 2024esakal
Updated on

Republic Day Parade 2024 : देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येते. यासोबतच दिमाखात पथसंचलन देखील करण्यात येते.

या पथसंचलनानंतर देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन देखील करण्यात येते. या चित्ररथांमधून विविध राज्यांच्या परंपरेची, इतिहासाची सुंदर झलक पहायला मिळते. प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापणेची झलक दाखवण्यात आली.

Republic Day Parade 2024
Republic Day Parade 2024: दिल्लीच्या कर्तव्य पथावर झळकले माँसाहेब आणि बाल शिवबा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ

उत्तर प्रदेशच्या या चित्ररथाची थीम ही 'अयोध्या: विकसित भारत-समृद्ध विरासत' वर आधारित असल्याचे दिसून आले. या चित्ररथाचा पुढील भाग हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे प्रतिक आहे. या चित्ररथातील प्रभू श्रीरामांचा हाती धनुष्य घेतलेला पुतळा हा त्यांचे बालपणीचे स्वरूप दर्शवतो.

या चित्ररथाच्या मागील भागात ‘वंदे भारत’ रेल्वे आणि मिसाईल दाखवण्यात आली. चित्ररथाच्या पुढील भागात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची झलक, प्रभू श्रीरामांचे बालपणीचे स्वरूप आणि विकसित उत्तर प्रदेशची झलक या चित्ररथातून पहायला मिळाली.

Republic Day Parade 2024
Republic Day Parade 2024 : चिपळूणचे विघ्नहर्ता महिला वादक पथक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आघाडीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.