मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख जाहीर

ही तारीख बदलण्यामागे केंद्र सरकारचा खास हेतू आहे.
PM Modi
PM ModiANI
Updated on

Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव (Republic Day Celebrations) आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस (Subash Chandra Bose) यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने हा निर्णय भारताच्या इतिहासातील सुभाषचंद्र बोस याचं योगदानाच्या स्मरणार्थ घेतला आहे. (Republic Day Celebrations will now begin every year from 23rd January instead of 24th January)

PM Modi
‘१६ जानेवारी हा ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’; स्टार्टअप्स हा नव्या भारताचा कणा’

भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केलं आहे. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.

PM Modi
24 तासात 2 लाख 67 हजार रुग्णांची नोंद, मृत्यूही वाढले

केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्या आहेत. गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्ये, वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिलं होतं की, 21 ऑक्टोबर 1943 रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या आझाद हिंद सरकारच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीच्या स्मरणार्थ पर्यटन मंत्रालय क्युरेटेड टूरचे आयोजन करत आहे. "सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांचा समावेश असेल. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडलेल्या स्मृती स्थळांचा समावेश असणार आहे. नेताजींशी संबंधित स्मृती स्थळांची जगाला ओळख करून देण्यासाठी टूर ऑपरेटर्सना करण्यात येईल," असं एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं पीटीआयने म्हटलं होतं.

PM Modi
हॉटेल ताजबद्दलच्या या 10 गोष्टी फार कमी लोकांना माहित आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()