Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना कोणत्या सोयी-सुविधा मिळतात? जाणून घ्या

पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना कोणत्या सोयी-सुविधा मिळतात?
Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना कोणत्या सोयी-सुविधा मिळतात? जाणून घ्या
Updated on

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे.

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, दक्षिण चित्रपट अभिनेते चिरंजीवी आणि बिंदेश्वर पाठक यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याचवेळी बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप, फातिमा बीबी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना पद्मभूषण जाहीर करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या आणि विशेष कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिले जातात. अशा परिस्थितीत पद्म पुरस्कारांचा इतिहास काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्या लोकांना ते मिळते? पद्म पुरस्काराने सन्मानित झाल्यावर काय मिळते?

काय आहे पद्म पुरस्कारांचा इतिहास?

पद्म पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. 1954 पासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त याची घोषणा केली जाते.

कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, मेडिसिन, सामाजिक कार्य, विज्ञान यासह अनेक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या आणि विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले जातात.

padmaawards.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार 1954 पासून भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार देत आहे. पद्मविभूषणमध्ये तीन वर्ग होते. पहिला वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग.

या वर्गांची नावे नंतर बदलण्यात आली. ८ जानेवारी १९५५ रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली, त्यानंतर या श्रेणींना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे नाव देण्यात आले.

हा सन्मान कोणाला मिळतो?

कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक कार्य, व्यवसाय आणि उद्योग यासह अनेक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या आणि विशेष कार्य करणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिले जातात.

पद्मविभूषण: अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी

पद्मभूषण: उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी

पद्मश्री: विशिष्ट सेवेसाठी

गृह मंत्रालयाच्या मते, कोणतीही व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहे. तथापि, सरकारी कर्मचारी पदावर राहेपर्यंत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. मात्र, डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना यातून सूट देण्यात आली आहे.

पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना कोणत्या सोयी-सुविधा मिळतात?

दरवर्षी राष्ट्रपती भवनात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यादरम्यान, पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी आणि शिक्का असलेले प्रमाणपत्र आणि मेडल दिले जाते.

पुरस्कार मिळणाऱ्यांना त्यांच्या मेडलची प्रतिकृती देखील दिली जाते, जी ते कोणत्याही कार्यक्रमात परिधान करू शकतात. सादरीकरण समारंभाच्या दिवशी पुरस्कार विजेत्यांची नावे भारतीय राजपत्रात प्रसिद्ध केली जातात.

या पुरस्कारात कोणतीही रक्कम दिली जात नाही. तसेच रेल्वे प्रवास किंवा हवाई प्रवासाच्या सुविधाही दिल्या जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.