प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारीला साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील परेड पाहणं हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असतं. सरकारकडून या दिवशी परेड पाहण्यासाठी काही लिमिटेड संख्येसाठी ऑनलाईन तिकीटची सेवा उपलब्ध करून दिली जाते.
26 जानेवारीला ही परेड पाहण्यासाठी हजारो लोक येतात, शिवाय त्यांना येथे भारतीय लष्कराची ताकदही पाहायला मिळते. यावेळीही 26 जानेवारीची तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला ही परेड कशी पाहू शकता ते सांगत आहोत.
26 जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी असे कोणतेही नियम नाहीत, म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्ती परेड पाहण्यासाठी येऊ शकते. यामुळेच दरवर्षी परेड पाहण्यासाठी दूरदूरहून लोक दिल्लीच्या इंडिया गेटवर पोहोचतात. पहाटे 5 वाजल्यापासून येथे लोकांची गर्दी होऊ लागते आणि लांबच लांब रांगा लागतात.
एंट्री कशी मिळणार?
आता प्रश्न असा आहे की 26 जानेवारीच्या परेडमध्ये एंट्री कशी मिळणार? यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि तुमचे तिकीट बुक करावे लागेल. पूर्वी तिकीट काढण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा सरकारी कार्यालयात जावे लागत होते, परंतु आता तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाइन बुक करू शकता.
तुम्ही aamantran.mod.gov.in वर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तिकीट बुक करू शकता. येथे तुम्हाला मोबाईल नंबर, ई-मेल आणि ओटीपी टाकावा लागेल. जर तुम्हाला जवळून चित्र रथ आणि परेड बघायची असेल तर तुम्हाला 500 रुपयांचे तिकीट घ्यावे लागेल. सर्वात स्वस्त तिकीट 20 रुपये आहे. ऑफलाइन तिकिटांसाठी तुम्ही ITDC किंवा DTDC काउंटरवर जाऊ शकता. तिकीट मिळाल्यावर तुम्हाला सकाळी ६ वाजेपर्यंत इंडिया गेटला पोहचावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.