Republic Day Parade : भारत 74वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. या प्रजासत्ताक दिवसावर अनेक गोष्टी खास असणार आहे. या वर्षी परेड दरम्यान देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक विकास आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचं प्रदर्शन दिसणार आहे.
23 देखावा सादर होणार आहे जे कार्यक्रमाची शोभा वाढवणार. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधून 17 आणि वेगवेगळ्या मंत्रालयातून आणि विभागातून 6 देखावे सहभागी होणार. जाणून घेऊया या वेळेस काय काय असणार खास... (Republic Day Parade passenger drone to Womens empowerment read story)
इजिप्तचे राष्ट्रपती आहे चीफ गेस्ट, सेना पण घेणार सहभाग
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख पाहूणे असणार. पहिल्यांदा अल सीसी प्रजासत्ताक दिनाचे चीफ गेस्ट बनवले आहे. इजिप्तच्या सेनेची एक तुकडीपण प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. इजिप्तच्या सेनेचे 144 जवान सहभागी होणार आहे. या परेड मध्ये इजिप्तच्या सेनेचे 12 सदस्यीय बँडपण सहभाग घेणार.
स्वदेशी इंडियन फील्ड गन देणार सलामी
पारंपारीकरित्या प्रजासत्ताक दिनी 21 तोफांची सलामी देणार पण ज्या तोफांनी सलामी दिली जायची त्या तोफा नसणार. आधी 21 तोफांची सलामी ही ब्रिटिश काळातील 25-पाउंडर आर्टिलरी (25-Pounder Artillery) ने दिली जायची पण आता यावेळी भारतात बनलेल्या 105 मिमीच्या इंडियन फील्ड गन (105 mm Indian Field Gun) दिली जाणार.
पॅसेंजर ड्रोन
राजपथवर भारताचे पहिले पॅसेंजर ड्रोन दिसणार. या पॅसेंजर ड्रोनला वरुणा नाव देण्यात आले आहेत. याला पुणेच्या सागर डिफेंस इंजीनियरिंगनी बनवले आहे. काही वर्षापूर्वी भारतीय नौसेनेने नवी दिल्लीत पीएम नरेंद्र मोदीच्या उपस्थितीत वरुणाला सादर केलं होतं.
या पॅसेंजर ड्रोनमध्ये फक्त एक व्यक्ती सवारी करू शकतो. हे पैसेंजर ड्रोन 130 किलोग्राम वजनाचे आहे तर जवळपास 25 किलोमीटरपर्यंत उडाण भरू शकतात. एक वेळा उडाण घेतल्यानंतर वरुणा ड्रोन 25-33 मीनिटापर्यंत हवेत राहू शकतं.
मादी ऊंट सवार
देशातील सीमा सुरक्षा दलाचा पहिला मादी ऊंट सवार सेनेकडून केला जाणार. परेडमध्ये पहिल्यांदा मादी ऊंटसवारी करत राजपथच्या परेडमध्ये सहभागी होणार. या बीएसएफ वूमेन कॅमल कॉन्टीजेन्टला राजस्थानच्या फ्रंटियरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि बीकानेर सेक्टरमध्ये तयार करण्यात आले आहे. किया है.
वायुसेनेचे गरुड कमांडो होणार सहभागी
या वेळी प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये पहिल्यांदा भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो सहभागी होणार. गरुड कमांडो (Garud Commando) इंडियन एयरफोर्सचा स्पेशल फोर्स आहे. जगातील बेस्ट कमांडो फोर्समधील एक फोर्स आहे. 72 आठवड्याच्या ट्रेनिंगनंतर हे कमांडो बनतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.