अमरनाथ येथे बचावकार्य वेगात सुरू; यात्रा स्थगित

जम्मू मार्गे अमरनाथ यात्रा स्थगित; ६५ जणांवर उपचार
Amarnath Yatra
Amarnath YatraSakal
Updated on

जम्मू - अमरनाथ यात्रा सुरू असताना शुक्रवारी दुपारी ढगफुटी झाल्याने १६ भाविकांचा मृत्यू झाला असून अद्याप ४० जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. ६५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरनाथ येथे बचाव कार्य वेगात सुरू आहे.

जम्मू काश्‍मीर पोलिस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आयटीबीपी, लष्कराकडून अमरनाथ येथे बचावकार्य राबविले जात आहे. दुसरीकडे आज वातावरण खराब झाल्याने जम्मू मार्गाने होणारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याने परिसरात पाणी वाढले. यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात ७ पुरुष, ६ महिलांचा समावेश असून दोन मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. या ढगफुटीत ६५ जण जखमी झाले असून त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात जवानांना यश आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढगफुटी आणि वातावरण खराब असल्याने काल पहेलगाम आणि बालताल येथून यात्रा तूर्त स्थगित केली. अमरनाथ येथील स्थिती पाहता आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आणि रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले. याशिवाय सर्व शासकीय अधिकाऱ्यांना फोनवर उपलब्ध राहण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.

लाखाहून अधिक भाविकांचे दर्शन

जम्मूतील दोन तळावरून भाविक अमरनाथ यात्रेला रवाना होतात. परंतु हवामान खराब असल्याने दोन्ही ठिकाणांहून नव्याने भाविकांचा जत्था रवाना होणार नाही, असे सांगण्यात आले. ३० जूनपासून यात्रेला सुरवात झाली असून एक लाख भाविकांनी अमरनाथांचे दर्शन घेतले आहे. भगवती तळावरून आतापर्यंत ६९,५३५ भाविक रवाना झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()