Champai Soren : मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा राजीनामा

झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत पदाची राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Champai Soren
Champai Sorensakal
Updated on

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेत पदाची राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गैरव्यवहाराच्या आरोपावरून हेमंत सोरेन यांना फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत चंपई सोरेन यांच्याकडे सूत्रे सोपविली होती. २८ जूनला जामिन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे राज्याची सूत्रे देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.

आज चंपई सोरेन यांच्या निवासस्थानी झालेल्या सत्ताधारी पक्षांच्या बैठकीत हेमंत सोरेन यांची पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. याबैठकीला काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर आणि प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर उपस्थित होते. त्यानंतर चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा सादर केला. हेमंत सोरेन यांनी शपथ घेतल्यास ते राज्याचे १३ वे मुख्यमंत्री ठरतील.

चंपई सोरेन यांनी राजीनामा दिल्याने त्यांची कारकीर्द पाचच महिन्यांची ठरली. राजीनामा द्यावा लागल्याने ते नाराज होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यावरून भाजपनेही ‘झामुमो’वर टीका केली आहे. ‘कुटुंबाकडून चालविल्या जाणाऱ्या पक्षामध्ये बाहेरील व्यक्तींना कोणतेही राजकीय भवितव्य नसते. चंपई सोरेन यांनी बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेऊन हेमंत सोरेन यांच्याविरोधात बंड करावे,’ असे आवाहन भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com