Udhyanidhi: सनातन धर्माचा मी आदर करते, तुम्ही...; ममता बॅनर्जी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना सुनावलं

Udhyanidhi mamta banarjee
Udhyanidhi mamta banarjee
Updated on

कोलकाता- तमिळनाडूच्या लोकांबद्दल मला फार आदर आहे. माझी त्यांना विनंती आहे, की प्रत्येक धर्माच्या भावना असतात, त्या जपल्या जाव्या. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. भारत एक लोकशाही देश असून विविधतेत एकता ही पंरपरा आहे. मी सनातन धर्माचा आदर करते. सनातन धर्मावर वक्तव्य करताना लोकांच्या भावनांचा आदर करावा, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी उदयनिधी यांना सुनावलं आहे.

उदयनिधी यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसने उदयनिधी यांच्या वक्तव्यावरुन सावध पवित्रा घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या भावना दुखावतील अशा कोणत्याही घटनेत आपण सहभागी राहू नये, असा उपदेश ममतांनी उदयनिधी यांना दिला.

Udhyanidhi mamta banarjee
Udhayanidhi: मी पुन्हा पुन्हा तेच बोलत राहीन; उदयनिधी स्टॅलिन यांचा 'सनातन' वक्तव्यावर हेका कायम

मी सनातन धर्माचा आदर करते. आपण मंदिर, चर्च, मशिद असं सगळीकडे जात असतो. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावतील असं आपण काही करु नये. विविधतेत एकता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे निषेध म्हणण्यापेक्षा, माझी सगळ्यांना विनंती आहे की एका मोठ्या समाजाला किंवा छोट्या समाजाला दु:ख होईल असं काही करु नये, असं ममता म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर नापसंती दर्शवली आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांच्या वक्तव्याने इंडिया आघाडीही अडचणीत आली आहे. यापर्श्वभूमीवर ममता यांनी दोन दिवसानंतर यावर भाष्य केलं. तृणमूल काँग्रेसकडून या घटनेला दुर्दैवी म्हणण्यात आलंय.

Udhyanidhi mamta banarjee
सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा संताप; उदयनिधी यांचा केला निषेध

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट केला जावा असं वक्तव्य केलं होतं. सनातन धर्माला विरोध नाही तर तो संपूर्ण नष्ट करावा. सनातन धर्म कोरोना, डेंगु, मलेरिया सारखा आहे. त्याचे निर्मुलन करायला हवे. सामाजिक समतेसाठी ते आवश्यक असल्याचं ते म्हणाले होते. सोमवारी बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()