दिलासादायक! जूनच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात घट; केंद्र सरकारची माहिती

LTA Cash Voucher Scheme
LTA Cash Voucher Schemeesakal
Updated on

नवी दिल्ली - कंज्यूमर प्राईस इंडेस्कवर (Consumer Price Index) आधारित किरकोळ महागाईचा (Retail Inflation Rate) दर जून महिन्याच्या तुलनेत कमी झाला आहे. जूनमध्ये महागाई दर ७.०१ पर्यंत गेला होता. तर जुलैमध्ये किरकोळ महागाई दर ६.७१ टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या माहितीमुळे महागाईमुळे होरपळलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये किरकोळ महागाई दर ५.५९ होता. (Retail inflation down news in Marathi)

LTA Cash Voucher Scheme
GST on house rent: आता घरभाड्यावर १८ टक्के जीएसटी! तुमचाही समावेश होतोय का?

किरकोळ महागाई दर जुलैमध्ये 6.71 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे मुख्यत्वे खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याचं सरकारी आकडेवारीतून दिसून येतं. आकडेवारीनुसार, जुलै 2022 मध्ये अन्नधान्याची महागाई जूनमध्ये 7.75 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांवर आली.

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ चलनवाढ रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या वरच आहे. गेल्या सात महिन्यांपासून तो 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत किरकोळ महागाई सात टक्क्यांच्या वर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.