नवी दिल्ली- कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व डॉक्टरांना उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आवाहन दिले आहे. तसेच, त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्यार उचलले होते. कोर्टाने यावेळी असंही स्पष्ट केलं की, कायम कामावरून अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कोर्टाच्या या निर्णयामुळे डॉक्टर कामावर रुजू होण्याची शक्यता आहे