Narendra Modi : 2022 मध्ये अदानींच्या संपत्तीत 46 टक्क्यांनी वाढ; काँग्रेस नेत्याचा दावा

Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi
Updated on

नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सामाजिक न्यायासााठी प्रतिबद्ध असल्याच्या विधानावरून भाजपवर टीका केली आहे. तसेच भाजप सरकारच्या काळात "श्रीमंत अधिक समृद्ध होत असून गरीब आणखी गरीब होत आहेत.

Rahul Gandhi and Narendra Modi
OPEC प्लसचा भारताला धक्का; रशिया येणार मदतीला धावून

भाजपच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या सदस्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सामाजिक न्याय हा त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीचा आधार आहे. भाजप विकास, विश्वास आणि नवीन कल्पनांचा समानार्थी शब्द असल्याचे मोदींनी म्हटले होते. विरोधी पक्षांवर निशाणा साधत मोदी म्हणाले होते की, विरोधी पक्षांची संस्कृती कुटुंबवाद, घराणेशाही, जातीवाद आणि प्रादेशिकता आहे.

ते म्हणाले होते की, “भाजपची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयांना सोबत घेण्याची आहे. छोटा विचार करणे, छोटी स्वप्ने पाहणे आणि त्याहूनही कमी यश मिळवून त्याचाच आनंद साजरा करणे ही काँग्रेससारख्या पक्षांची संस्कृती आहे. एकमेकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे. मोठी स्वप्ने पाहणे आणि आणखी साध्य करण्यासाठी जीवाची बाजी लावणे ही भाजपची राजकीय संस्कृती आहे.

Rahul Gandhi and Narendra Modi
Pune Lok Sabha Bypoll Election : पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मोठ्या घडामोडी; भाजपची ३ नावं समोर

सिब्बल यांनी ट्विट केले, “पंतप्रधान म्हणाले की भाजप सामाजिक न्यायासाठी जगतो आणि त्याचे अक्षरशः पालन करतो. वस्तुस्थिती अशी आहे की-

1) 2012 ते 2022 या काळात कमावलेल्या पैशांपैकी ४० टक्के रक्कम केवळ एक टक्का लोकसंख्येला मिळाली.

2) 2022 मध्ये अदानींच्या संपत्तीत 46 टक्क्यांनी वाढ झाली.

3) 64 टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) खालच्या स्तरातून आला, 50 टक्के, तर आघाडीच्या केवळ 10 टक्के लोकांनी केवळ ४ टक्के टॅक्स भरला.

सिब्बल म्हणाले , गरीब आणखी गरीब होत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.