AK-47 Case : 'मीम'मधून फेमस झालेल्या बाहुबली नेत्याची आमदारकी गेली

RJD आमदाराला न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावलीय.
Anant Singh
Anant Singhesakal
Updated on
Summary

RJD आमदाराला न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावलीय.

बिहारचे बाहुबली नेते अनंत सिंह (Anant Singh) यांना एमपी-एमएलए न्यायालयानं (MP MLA Court) 10 वर्षांची शिक्षा सुनावलीय. न्यायालयानं शिक्षा सुनावल्यापासूनच अनंत सिंह यांच्या आमदारकीवर टांगती तलवार होती. आता अनंत सिंह यांची आमदारकी गेलीय. विधानसभा सचिवालयानं राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) अनंत सिंह यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केलाय.

बिहार विधानसभेचे (Bihar Legislative Assembly) प्रभारी सचिव पवन कुमार यांनी अनंत सिंह यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. बिहार विधानसभेच्या प्रभारी सचिवांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलंय की, मोकामाचे आमदार अनंत सिंह यांना एमपी एमएलए न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर, दोषी ठरल्याच्या तारखेपासून त्यांचं विधानसभा सदस्यत्व संपुष्टात येत आहे.

Anant Singh
कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथीयांकडून धोका; गृहमंत्रालयानं गुप्तचर यंत्रणेला केलं 'सतर्क'

अनंत सिंह यांच्या घरावर पोलिसांचा छापा

बिहार विधानसभेच्या सचिवालयानं जारी केलेल्या या आदेशात सदस्यांची यादी सुधारित मानण्यात यावी, असंही म्हटलंय. विशेष म्हणजे, 21 जून रोजी कोर्टानं छोटे सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनंत सिंह यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2019 च्या खटल्यात अनंत सिंह यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. 2019 मध्ये पोलिसांनी अनंत सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता. तासभर चाललेल्या या छाप्यात पोलिसांनी एके-47 जप्त केली होती.

Anant Singh
Jammu Kashmir : जवानांमध्ये वादातून गोळीबार; दोन ठार, तर दोघे जखमी

अनंत सिंहांनी RJD च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती

तीन-चार दिवस बिहार पोलिसांना (Bihar Police) चकमा देऊन अनंत सिंहनं दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात आत्मसमर्पण केलं. यानंतर बिहार पोलिसांनी अनंत सिंहला दिल्लीहून पाटण्याला नेलं. न्यायालयानं या प्रकरणी अनंत सिंहला दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावलीय. अनंत सिंह 2020 साली RJD च्या तिकिटावर मोकामा मतदारसंघातून (Mokama Constituency) आमदार म्हणून निवडून आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()