RJD Chief Lalu Yadav son Tej Pratap Yadav
RJD Chief Lalu Yadav son Tej Pratap Yadavesakal

Varanasi : उपमुख्यमंत्र्यांच्या भावासोबत गैरव्यवहार; सामानासकट हॉटेलमधून हाकलून दिलं

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) यांच्या मुलासोबत एक अपमानास्पद घटना घडलीये.
Published on
Summary

हॉटेल व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार दोन्ही खोल्या इतर कोणीतरी ऑनलाइन बुक केल्या होत्या. तर, मंत्री आणि त्यांच्या लोकांनी ही खोली बुक न करताच सामान ठेवलं होतं.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव (Lalu Yadav) यांच्या मुलासोबत अपमानास्पद घटना घडलीये. तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचं वाराणसीच्या सिगरा भागातील हॉटेलमधून साहित्य बाहेर काढण्यात आलं.

यासंदर्भात मंत्री तेज प्रताप यादव यांचे स्वीय सहाय्यक विशाल सिन्हा यांनी सिगरा पोलिस ठाण्यात (Sigra Police Station) तक्रार दाखल केलीये. काशी झोनचे डीसीपी आरएस गौतम यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हॉटेल व्यवस्थापनाचीही चौकशी करण्यात येत आहे.

सहाय्यक विशाल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेज प्रताप यांचं साहित्य आर्केडिया हॉटेलमधील (Arcadia Hotel) रुम क्रमांक 205 आणि 206 मध्ये ठेवण्यात आलं होतं. रुम क्रमांक 206 मध्ये मंत्री तेज प्रताप यादव थांबले होते. तर, सहाय्यक आणि सुरक्षा कर्मचारी 205 मध्ये वास्तव्यास होते.

RJD Chief Lalu Yadav son Tej Pratap Yadav
China Taiwan Conflict : चीन-तैवान संघर्ष पेटला! 40 चिनी लढाऊ विमानं घुसली तैवानच्या हद्दीत

मंत्री आणि इतर सर्वजण शुक्रवारी रात्री गंगेत बोटिंग करून हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा दोन्ही खोल्यांतील सामान बाहेर ठेवण्यात आलं होतं. यासंदर्भात हॉटेल कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, हॉटेलचे जीएम संजय कुमार यांच्या सांगण्यावरून हे करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या घटनेनंतर मंत्री, त्यांचे स्वीय सहायक आणि सुरक्षा कर्मचारी तेथून सामान घेऊन निघून गेले.

RJD Chief Lalu Yadav son Tej Pratap Yadav
RJD Chief Lalu Yadav son Tej Pratap Yadav
RJD Chief Lalu Yadav son Tej Pratap Yadav
VIDEO : भाजपमध्ये गेल्याची एवढी मोठी शिक्षा? तीन महिलांनी घातलं 'दंडवत' अन् 'या' पक्षात केला प्रवेश

याबाबत डीसीपी गौतम यांनी सांगितलं की, हॉटेल व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार दोन्ही खोल्या इतर कोणीतरी ऑनलाइन बुक केल्या होत्या. तर, मंत्री आणि त्यांच्या लोकांनी ही खोली बुक न करताच सामान ठेवलं होतं. त्यामुळंच त्यांचं साहित्य बाहेर काढण्यात आलं. मंत्री व इतरांचे साहित्य बुकींग न करता हॉटेलमध्ये कसं ठेवण्यात आलं, याची चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.